"विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

No edit summary
 
अशी उर्मटपणाची वागणूक जुने सदस्य नव्यांना देणार असतील तर नवीन सदस्यांनी येथे का यावे? बरं ज्यांनी हा संदेश टाकला त्यावर साधी सही पण नाही...[[सदस्य:Katyare| निनाद]] १६:५८, १३ डिसेंबर २०१३ (IST)
 
:निनाद,
:ही बाब येथे लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
:ज्या संपादकाने असा संदेश ऋषिकेष यांना दिला त्यांच्या पानावरही हे नोंदवावे. जर निनावी संदेश असेल तर त्यासाठी काय करता येईल हे माहिती नाही. निनावी संदेशांना कितपत महत्व द्यावे ते वाचणाऱ्यानेच ठरवावे हा सुज्ञपणा.
:जरी लिहिण्यात उर्मटपणा वाटला तरीही ऋषिकेष यांनी आपला अपमान झाल्याचे दाखविलेले नाही. त्यांच्या समंजसपणाची दखल घेतलेली आहे.
:माहितगार यांनी लिहिल्याप्रमाणे मूळ संदेशातील प्रश्न विचारण्यात वावगे नाही. गेल्या अनेक वर्षांत अनेक सदस्यांनी आपल्याला आवडलेला मजकूर थेट नकल-डकव केल्याची अनेक उदाहरणे सापडतील. तरी एखाद्या सदस्याने (विशेषतः नवीन सदस्य ज्यांना प्रताधिकाराबद्दल कितपत माहिती असेल हे कळण्यास मार्ग नसतो) मोठा मजकूर टाकला तर प्रश्न विचारण्यास हरकत मुळीच नाही. त्यास उत्तर देण्याबद्दल ऋषिकेष यांचे धन्यवाद.
:आपण स्वतःही अनेक वर्षे येथे कार्यरत आहात आणि त्याचे आम्हा सर्वांस कौतुकच आहे. आपणही ऋषिकेष यांना दोन शब्द कौतुकाचे द्यावेत ही विनंती. जुन्या सदस्याकडून दखल घेतली गेल्यास नवीन सदस्यांना बरेच वाटावे.
:असो, आपणास येथील कामाबद्दल कळकळ आहे आणि तुम्ही त्यातूनच वरील संदेश दिला असे मी समजतो आहे.
:धन्यवाद.
:[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) २०:५६, १३ डिसेंबर २०१३ (IST)