"कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १४४:
 
कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकरांच्या कुठे फारशा नोंदवल्या न गेलेल्या एका लेखनविषयक प्रयोगाबद्दल ही टीप आहे. संवादलेखनात येणाऱ्या नपुंसकलिंगी मराठी शब्दाच्या शेवटी येणारा {एके काळी अनुस्वारयुक्त लिहिला जाणारा आणि कोकणी लोकांकडून अनुनासिक उच्चारला जाणारा) एकार (उदा० 'गाव' याचे अनेकवचन 'गावें'; ’जसें’; 'कसें') हा संभाषणात पुष्कळदा दीर्घ अकार होऊन येतो. या दीर्घ अकारासाठी अनुस्वाराचेच चिह्न (म्हणजे अक्षराच्या डोक्यावर दिले जाणारे भरीव टिंब) वापरण्याचा प्रघात आहे. (गावें ऐवजी गावं; जसें ऐवजी जसं आणि तसें ऐवजी तसं) .म्हणजेच, एकच चिह्नाचे दोन पूर्णत: अलग उच्चार होतात. दाखल्यादाखल, - 'टिंब', 'संबंध' या शब्दांमधले टिंब हे अनुस्वारदर्शक आहे, तर 'जसं', 'मधलं' यांमधले टिंब हे पदान्तीचा दीर्घ अकार दाखवणारे आहे. मराठी संभाषणात येणारा पदान्तीचा दीर्घ अकार अनुस्वाराहून वेगळा दाखवण्यासाठी कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकरांनी त्यांच्या 'गीतार्थदर्शन' (१९९४) या ग्रंथात टिंबाच्या ऐवजी शून्यसदृश पोकळ आकाराचा वापर केला आहे. या ग्रंथाच्या अनुक्रमणिकेतले स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे: "या ग्रंथातल्या मराठी मजकुरात सर्वत्र पदान्तीच्या दीर्घ अकाराचं चिह्न म्हणून त्या त्या अक्षराच्या डोक्यावर पोकळ टिंब-शून्य-दिलं आहे". (उद्धृत केलेल्या मजकुरात अर्जुनवाडकरांनी 'अकाराचं' आणि 'दिलं' या शब्दांमधे पोकळ टिंबच वापरले आहे; शिरोरेघेच्या वर दिले जाऊ शकेल असे पोकळ टिंब किंवा शून्य देवनागरी युनिकोडात आपातत: नाही, म्हणून इथे वापरता आलेले नाही).
 
सूचना : अर्जुनवाडकरांच्या या प्रस्तावासंबंधी व्यक्त केलेले प्रतिकूल मत चर्चापानावर वाचता येईल.
 
{{मराठी साहित्यिक}}