"स्त्रीवाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १९:
[[गोपाळ हरी देशमुख]] यांनी सुध्दा आपल्या [[शतपत्र|शतपत्रांमधून]] स्त्रीशिक्षणाचा पुरस्कार केला. [[लोकहितवादी]] या नावाने १८४८ ते १८५० या दोन वर्षात त्यांची शतपत्रे प्रभाकर मासिकातून प्रसिद्ध झाली. पुरुषांना पुनर्विवाहाची परवानगी असेल, तर स्त्रियांनाही पुनर्विवाहाची परवानगी असली पाहिजे असे लोकहितवादींचे म्हणणे होते. त्यांनी विधवांचे [[केशवपन]] करण्याच्या प्रथेवरही कडाडून टीका केली. काडीमोड करायचा झाल्यास तो पती-पत्नीच्या संमतीनेच झाला पाहिजे. पती जर पत्नीचा छळ करत असेल तर तिला पतीपासून विभक्त होता आले पाहिजे आणि अशा प्रकरणात तिला [[पोटगी]] मिळाली पाहिजे, असा विचार लोकहितवादींनी मांडला.
 
[[महादेव गोविंद रानडे]] हे सुधारक विचारवंत स्त्री-पुरुषांच्या समान हक्कांचे कट्टर पुरस्कर्ते होते. त्या काळी गाजलेल्या [[रखमाबाई विरुध्द दादाजी खटला]] ह्या खटल्यात कोर्टाने रखमाबाईने शिक्षा भोगावी किंवा स्वतःच्या मनाविरूध्द नव्या नवऱ्याकडे नांदावे असा पर्याय ठेवला होता. तेव्हा म.गो.रानडे यांनी [[वक्तृत्वोत्तेजक सभा|वक्तृत्वोत्तेजक सभेत]] भाषण देऊन आपला पुरुषार्थ केवळ स्त्रियांशी वागतांनाच दाखवणाऱ्या पुरूषवर्गावर जोरदार टीका केली व स्त्रियांच्या अधिकारांचा पुरस्कार केला होता. विवाहयोग्य ठरण्यासाठी मुलामुलींची किमान वयोमर्यादा कायद्याने ठरवली पाहिजे, सरकारी यंत्रणेने परवानगी दिल्यानंतरच विवाहविधी केले पाहिजेत, [[बाला-जरठ विवाह|वृध्दांनीवृद्धांनी कुमारिकांशी विवाह]] करू नये अशी आग्रहाची मागणी करणारे विचार रानडे ह्यांनी मांडलेले दिसून येतात.
 
[[गोपाळ गणेश आगरकर|गोपाळ गणेश आगरकरांनी]] १८८८ मध्ये [[सुधारक वर्तमानपत्र]] काढले. सुधारकात लिहिलेल्या स्वयंवर, विवाहनिराकरण([[घटस्फोट]]), प्रियाराधना अशा निंबंधांमधून स्त्रीजीवनासंबंधी सुधारणा आगरकरांनी सुचविल्या आहेत. त्यांनी [[बालविवाह|बालविवाहाची]] चाल कायद्याने बंद व्हावी म्हणून प्रयत्न केले. स्वयंवर पद्धतीनेच म्हणजे स्त्रीच्या इच्छेने विवाह व्हावा असा त्यांचा आग्रह होता. स्त्री पुरुषांसाठी समान स्वातंत्र्याची व समान संधींची मागणी आगरकरांनी केली होती.