"रखमाबाई विरुद्ध दादाजी खटला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: == पार्श्वभूमी == रखमाबाईंचे प्रथम पती - दादाजी भिकाजी ह्यांच्या आ...
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
(काही फरक नाही)

०२:४१, २९ नोव्हेंबर २०१३ ची आवृत्ती

पार्श्वभूमी

रखमाबाईंचे प्रथम पती - दादाजी भिकाजी ह्यांच्या आईनं हरिश्चंद्रजींकडून 'जयंतीबाईंच्या मुलीचं लग्न माझ्या मुलाशी करून दे', असं वचन घेतलं होतं. त्याप्रमाणे वयाच्या नवव्या वर्षीच रखमाबाईंचा विवाह झाला. सासरी पाठवायची वेळ येईतो मात्र ह्या दोन घरांमधल्या आधीच असणार्‍या सांस्कृतिक, वैचारिक, आर्थिक सगळ्याच दर्‍या अधिकच रूंदावल्या. दरम्यान, दादाजींना व्यसनं जडली. स्वतःचं घर नव्हतं; ते त्यांच्या मामांच्या घरी राहत. इतकंच नव्हे, तर ते मामांवर आर्थिकरीत्या पूर्णपणे अवलंबून होते. दम्याचा विकार जडला होता. मामांच्या घरचंही वातावरण म्हणजे - घरच्या लक्ष्मीवर अत्याचार, तर घरात आणून ठेवलेल्या बाईच्या हाती सारी सत्ता. हे सगळं लक्षात घेऊन रखमाबाईंनी सासरी जाण्यास नकार दिला. खरंतर दादाजी अगदी सहज 'गेलीस उडत' म्हणून दुसर्‍या स्त्रीशी विवाह करू शकले असते. परंतु एका स्त्रीकडून आलेला नकार, तसेच जयंतीबाईंनी पुनर्विवाह केल्याने पूर्वपतीची रखमाबाईंच्या नांवे असलेली (दादाजींच्या मते २५,०० रूपये मूल्य असलेली) इस्टेट, ह्या कारणांकरता त्यांनी - बायकोला सासरी पाठवावे - असा कोर्टात दावा ठोकला.

स्वरूप

हा दावा सर्वप्रथम ऐकणारे न्यायाधीश पिन्ही ह्यांच्या निर्णयाप्रमाणे दादाजीचा restitution चा दावा टिकण्यालायक नव्हता कारण restitution चे इंग्लंडमधील निर्णय इंग्लिश पार्श्वभूमीवरच वाचले पाहिजेत. हिंदुस्तानातील विवाह ह्यांची पार्श्वभूमि मुळातच निराळी असल्याने ते निर्णय हिंदुस्तानात लागू करता येणार नाहीत. ह्या निर्णयाविरुद्ध दादाजीने अपील केले आणि त्यात निर्णय त्याच्या बाजूने होऊन रखमाबाईंनी दादाजीकडे राहावयास जायला हवे, न गेल्यास सजा भोगावी असा निर्णय दिला. त्यालाहि रखमाबाईंची तयारी होती. पण मधील काळात सुधारणापक्ष आणि सनातनी ह्या दोघांनी वातावरण तापवले होते. हायकोर्टात निर्णय रखमाबाईंविरुद्ध गेल्याने आणि रखमबाई कारावासालाहि तयार आहेत असे दिसल्यानंतर दोन्ही बाजूंनी माघार घेतली आणि रखमाबाईंनी दादाजीचा खर्च चुकता केल्यावर त्याने आपली मागणी ओढून धरली नाही.

ह्या वळणांवर टिप्पणी लिहितांना सनातनी पक्ष (टिळक, झळकीकर शास्त्री), सुधारणावादी (रानडे, वामनराव मोडक, मलबारी), मध्यममार्गवाले (तेलंग) ह्यांच्या भूमिका काय होत्या, 'हिंदू लेडी'च्या पत्रामागचे बोलवते धनी कोण होते असे विवेचन वाचायला आवडले असते. (ही पत्रे रखमाबाईंची मानली जातात पण ती दुसरेच कोणी लिहित असावेत कारण त्या काळात रखमाबाईंचे शिक्षण पूर्णपणे स्थगित होते आणि त्या पत्रातले इंग्रजी लिहिण्याइतपत त्यांचे इंग्रजी भाषेचे ज्ञान प्रगल्भ नव्हते. सखाराम अर्जुन त्यांच्या पुढील शिक्षणाबाबत उदासीन होते असे दिसते. येथे उपलब्ध असलेल्या एका विस्तृत निबंधामध्ये ह्या उदासीनतेबाबत अधिक वाचावयास मिळेल. तेथेच निबंधामध्ये आणि त्याच्या खालच्या विस्तृत टीपांमध्ये बरीच माहिती आहे जी अन्यत्र सहज दिसत नाही. सखाराम अर्जुन हे जरी नंतर रखमाबाईंच्या मागे उभे राहिले तरी आपलाच नातेवाईक दादाजी ह्यांच्याशी रखमाबाईंचा विवाह लावून देण्यामागे रखमाबाईंना त्यांच्या वाडिलांची जी मालमत्ता मिळाली होती ती घरातच राहावी असा त्यांचा हेतु असल्याचे सूचित केले आहे. दादाजीच नंतर नालायक निघाल्यामुळे सखारामांचे मत बदलले असावे.)

संदर्भ

Sanhita (चर्चा) ०२:४१, २९ नोव्हेंबर २०१३ (IST) संहिता (२८ नोव्हेंबर २०१३)