"जागत्या स्वप्नाचा प्रवास (पुस्तक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
संपादनासाठी शोध संहीता वापरली
ओळ ४५:
 
==स्वागत==
'पुस्तकाचे पान' या तत्कालीन साप्ताहिक सदरात दैनिक [[लोकसत्ता]]ने या पुस्तकाबद्दल "सचिनच्या कारकिर्दीचा सखोल वेध" या मथळ्याखाली माहिती प्रकाशित केली होती. <ref name="दैनिक लोकसत्ता">[[लोकसत्ता]] http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=137210:2011-02-18-11-06-49&catid=112:2009-08-05-07-55-49&Itemid=125 {{मृत दुवा}}</ref>
<blockquote>"सचिनविषयी ५००१ प्रश्न काढले तर त्यांची उत्तरं एकाच पुस्तकात किंवा एकाच वेबसाईटवर मिळतील का हे सांगता येणार नाही; मात्र डॉ. आनंद आत्माराम बोबडे या क्रिकेटवेड्या असामीने संकलित केलेल्या ‘जागत्या स्वप्नाचा प्रवास’ या पुस्तकात सचिनच्या कारकिर्दीचा इतक्या सखोलपणे वेध घेतलेला आहे की त्याला तोडच नसावी. सचिनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पणाच्या सामन्यापासून अगदी नुकत्याच संपलेल्या न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकांपर्यंत अक्षरश: सावलीसारखा माग काढत या संकलकाने सचिनच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा वेध घेतलाय. सचिनच्या विश्वविक्रमांपासून ते मदानावरच्या अगदी अगदी छोट्या-मोठ्या घडामोडी आणि घटनांचाही मागोवा या पुस्तकात आहे. १९८९ पासून २०१० पर्यंतच्या सचिनचा सहभाग असलेल्या प्रत्येक मालिका आणि सामन्याची नोंद या पुस्तकात आहे.
हे एक आगळेवेगळे पुस्तक आहे. एखाद्या क्रिकेटवीराचा मदानावरील असा प्रदीर्घ प्रवास टिपणारे अशा प्रकारचे हे पहिलेच आणि एकमेव पुस्तक असावे. कदाचित आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूवर इंग्रजीत किंवा दुसऱ्या एखाद्या भाषेत असेल, पण भारतीयावर तरी कुठे असल्याचे ऐकीवात नाही. एखाद्या मराठी क्रिकेटपटूवर इतक्या सखोलपणे अभ्यास करून लिहिलेलं हे मराठीतलंही एकमेव पुस्तक असेल.