"विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संपादनासाठी शोध संहीता वापरली
ओळ २८:
:ज्यानांकल्पना नाही त्यांना या सीमारेषा पुसट वाटतात.अभंग या विषयावर एक ज्ञानकोशीय लेखही होऊ शकतो पण त्यात अभंग/कविता कसा लिहावा हे विकिबुक्स या सहप्रकल्पात जावयास हवे आणि एखादा विशिश्ःट अभंग/कविता लेखन मूळ लेखन असल्यास विकिस्रोत या सहप्रकल्पात जावयास हवे.
 
इथे हे लक्षात घ्यावयास हवे कि एखाद्दा अभंगाचे/कवितेचे विवीध समिक्षकांनी रसग्रहण/समिक्षण कसे केले त्या विशीष्ट कवितेची निर्मिती प्रक्रीया या गोष्टी विश्वकोशिय परिघात येतात पण प्रत्यक्षात कविता अभंग नाटक हे ललित साहित्य विश्वकोशिय परिघात येत नाही.अजून एक उदाहरण द्यावयाचे झाल्यास बा सी मर्ढेकरांची "पिपात मेले ओल्या उंदीर" नावाची कविता आहे हि कविता विश्वकोशाचा हिस्सा होऊ शकत नाही ती (प्रताधिकाराचे प्रश्न नसतील तर विकिस्रोत या सहप्रकल्पात जावयास हवी) पण या कवितेची शेकड्याने अर्थ लावले गेले रसग्रहणे झाली आणि तेवढीच पिएचडी प्रबंधही एका कवितेवर झाले.<ref>http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=27172:2009-11-27-12-58-45&catid=104:2009-08-05-07-53-42&Itemid=117 {{मृत दुवा}}</ref>त्या कवितेचा उगम कशात असला पाहिजे ते नेमका अर्थ काय या संबधीच्या लेखनाचा मागोवा विश्वकोशिय लेखन संकेतास पाळून विकिपीडियात घेता येईल.आणि असा मागोवा घेताना अशा कवितेच्या/अभंगाच्या ओळी नमूद करावयास हरकत नाही. पण "पिपात मेले ओल्या उंदीर" या कवितेचा अभ्यास कसा करावा असे प्रकरण आणि कविते संदर्भात प्रश्नोत्तर पद्धतीचे लेखन विकिबुक्स मध्ये जावयास हवे
 
"रूप पाहतां लोचनीं"चे विवीध लोकांनी रसग्रहण कसे केले विवीध संगितकारांनी वेगवेगळ्या चाली कशा लावल्या याची संडर्भासहित माहिती या लेखात मिळणार असेल तर "रूप पाहतां लोचनीं" हा लेख मराठी विकिपीडियात असू शकेल पण अजून एक काळजी घेणे जरूरी आहे कि ते तुमचे व्यक्तिगत रसग्रहण असूनये.माझे आवडलेल्या हिन्दीचित्रपटगिताचे माझे स्वतःचे रसग्रहण विकिपीडियावर लिहिणे अभिप्रेत नाही पण मनोगतावर अभय नातू किंवा उपक्रम मायबोलीवर संकल्प द्रवीडांनी केलेल्या ( अजून तसे ऐकिवात नाही मी गमतीने उदाहरण देत आहे) रसग्रहणाची माहिती ते विकिपीडियावर देऊ शकणार नाहित पण मी मात्र त्यांच्या विकिपीडियाबाहेर झालेल्या रसग्रहणाचे संदर्भ वापरून अभंग/चित्र्पट गीत या बद्द्ल विश्वकोशिय मर्यादेत बसणारा इतर लेखन संकेतांचे पालन करित एखादा लेख लिहू शकेन.
Return to the project page "उल्लेखनीयता".