"मुहम्मद घोरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 18 langlinks, now provided by Wikidata on d:Q1647182
No edit summary
ओळ ३७:
|}}
'''महंमद घोरी''' (पूर्ण नाव- शिहाबउद्दीन महंमद घोरी) ([[इ.स. ११५०]]:घोर, [[अफगाणिस्तान|अफगानिस्तान]] - [[१५ मार्च]], [[इ.स. १२०६]]:दमिक, झेलम जिल्हा, [[पाकिस्तान]]) हा [[उत्तर भारत|उत्तर भारतातील]] मुस्लिम राज्याचा संस्थापक होता. घुर किंवा घोर या तुर्की राजघराण्यात त्याचा जन्म झाला. घुर आधुनिक अफगाणिस्तानच्या पश्चिम मध्य भागात हेरात आणि गझनीच्या मधोमध आहे. मोहम्मद घौरी हा भारतावर आक्रमण करणाऱ्या आक्रमकांपैकी होता. याने [[पृथ्वीराज चौहान|पृथ्वीराज चौहानचा]] थानेसर येथील लढाईत पराभव केला व [[दिल्ली सल्तनत|दिल्ली सल्तनतीची]] सुरुवात केली. भारतात इस्लामी राजवटीची सुरुवात मोहम्मद घौरीच्या आक्रमणानंतर झाली असे मानण्यात येते.
 
तुर्की अमीरांना घुरीद किंवा घोरी या नावाने ओळखले जात होते. महंमद घोरी हा घियासुद्दीन घोरी या घुर प्रमुखाचा धाकटा बंधू होता. इ.स. ११७३ मध्ये महंमद घोरीने गझनी काबीज केली तेव्हा तो आपल्या वडील बंधूच्या सैन्याचे नेतृत्व करीत होता. महंमदाने गझनी ताब्यात घेतल्यामुळे घियासुद्दीनने त्याला गझनी प्रांताचा राज्यपाल म्हणून नेमले तसेच मर्जीनुसार गझनीचे प्रशासन चालवण्याची आणि राज्याचा विस्तार करण्याची त्याला परवानगी दिली. काही वर्षांनी घियासुद्दीनच्या निधनानंतर महंमदाने आपले सार्वभौम राज्य जाहीर केले.
 
[[वर्ग:दिल्ली सल्तनत]]