"गनिमी कावा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
ओळ ९:
 
==गनिमी कावा म्हणजे काय?==
 
शिवाजी महाराजंनी प्रवर्तित केलेल्या युद्धतंत्रासे स्वरूप विशद करण्यापूर्वी 'गनिमी कावा' या शब्दप्रयोगाच्या मुळाशी असलेल्या संकल्पना, अर्थ आणि अनर्थ इत्यादी सर्वच तपासनू घेणे आवश्यक आहे.'गनीम' हा शब्द मूळ फारसी भाषेतला असनूअसून 'गनिमी' हे त्या शब्दाचे षष्ठ्यंतरूप आहे. 'कावा' या शब्दाला लक्षणेने 'फसवणूक', धोकेबाजपणा, कपट हे अर्थ आले आहेत. कावा या शब्दाचा वाच्यार्थ पार पुसला जाऊन लक्षणेने या शब्दला आलेला अर्थ प्रभावी ठरला आणि 'शत्रुचा कपटयुक्त हल्ला' अथवा 'कपट-युद्ध' असा 'गनिमी कावा' या संज्ञेचा अर्थ रूढ झाला. प्रश्‍न असा उद्‍भवतो की 'शत्रूचा कपटयुक्त हल्ला' या शब्दाप्रयोगात शत्रू कोण?
 
मराठ्यांच्या युद्धपद्धतीच्या निदर्शनात होत असल्याने गनीम म्हणजे मराठा असा अर्थ निघतो.म्हणजे 'गनिमी कावा' ही संज्ञा मराठ्यांच्या शत्रूंनी मराठ्यांच्या युद्धपद्धतीसाठी योजली हे स्पष्ट आहे. या शब्दाप्रयोगात अवहेलना स्पष्टपणे व्यक्त झाली आहे. हे लक्षात घेता आपणही मराठ्यांच्या युद्धपद्धतीचा उल्लेख 'गनिमी कावा' असाच करतो आणि मनात नसताही मराठ्यांच्या शौर्याचे अवमूल्यन करण्याचे कामी आपणही मराठ्यांच्या शत्रूची साथ करीत असतो हे आपल्या लक्षातही येत नाही!
Line २१ ⟶ २२:
कावा हा शब्द घोड्यांना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाशी संबंधित आहे.पोलीस-दलात आणि सैन्यातही बाळगण्यात येणाऱ्या घोड्यांना विशिष्ट प्रकारचे शिक्षण देणे आवश्यक असते.तसे झाले तरच त्या त्या दलांच्या कार्यात घोडा उपयुक्त ठरतो.मराठ्यांच्या लष्करात घोड्यांना देण्यात आलेले शिक्षण प्रामुख्याने 'काव्या'चे होते. भरवेगात धावणाऱ्या घोड्याचा वेग यत्किंचितही मंद होऊ न देता नि‍रनिराळ्या दिशांनी आणि उलटसुलट वळण घेण्यात मराठ्यांचे लष्करी घोडे तरबेज असत. वेग मंद करून हव्या त्या दिशेने वळणे घेणे हे घोडा आणि घोडेस्वार या दोघांनाही अवघड नसते. परंतु वेग मंदावला असताना दिशा वा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केल्यास समोरच्या माणसास वा शत्रूस तो कोणत्या बाजूने वळण घेणार आहे याचा अंदाज बांधता येतो. रणक्षेत्रात धावत्या घोड्यांच्या बाबतीत अशा प्रकारचा अंदाज बांधणे शत्रूस शक्य होऊ नये या हेतूने अनपेक्षित वळणे घेण्याचे शिक्षण लष्करी घोड्यांना देण्यात येत असे. तोच 'कावा'. ही वळणे घोडेस्वार युद्धाच्या सोयीच्या दृष्टीने घेत असतो. भरधाव दौडत येणारा वारू शत्रूची दिशामूल होते. काव्याच्या युद्धात शत्रूची दिशाभूल हे प्रधान उद्दिष्ट असते. अशा प्रकारची अनपेक्षित म्हणूनच फसवी वळणे घेऊन मराठ्यांचे घोडदळ लढत असे म्हणूनच मराठ्यांच्या शत्रूंनी या युद्धपद्धतीस 'गनिमी कावा' हे नाव दिले. या नावात मूळातच एक युद्धतंत्र दडलेले आहे ते दुर्लक्षित राहिल्याने 'गनिमी कावा' वा केवळ 'कावा' या शब्दास लक्षणेने 'कपट', फसवणूक' यांसारखे अर्थ प्राप्त झाले.
 
प्रेमात व युद्धात सर्वच क्षम्य असते या उक्तिने गनिमी काव्याची पाठराखण करता येते. आपल्या स्वराज्यावर आलेला शत्रू यास कसेही करून परतविणे हेच [[शिवाजी महाराज|शिवरायांचे]] उद्दिष्ट होते.
संजय भुजबळ (पुणे)
 
==गनिमी काव्याचे घटक==
यात :
* १. नियोजन व अंमलबजावणी
* २. समन्वय आणि नियंत्रण
 
या प्रमुख गोष्टी आहेत.त्यात सैन्य व्यवस्थापन तसेच वेळेचे व्यवस्थापनही अंतर्भूत आहे.
==गनिमी काव्याचे हेतू==
* १. श्त्रुला घाबरविणे किंवा दहशत बसविणे.
* २. त्याचे मानसिक खच्चीकरण
* ३. आर्थिकदृष्ट्या शत्रुला अपंग करणे
* ४. कोंडीत पकडणे.
* ५. अशी परिस्थिती तयार करणे ज्याने तो शरण येण्यास बाध्य होइल.
* ६. शत्रुला लढाई मैदान सोडून पळुन जावयास लावणे.
* ७. शत्रुसैन्याची फळी विस्कळीत करणे.
* ८. त्याला फसविणे.
* ९. चुकिची माहिती मुद्दाम पुरविणे.
* १०. त्याची दिशाभूल करणे
*११. शत्रुला बेसावध करणे.
* १२. आपण दुर्बल आहोत किंवा लढाइची हिम्मत आपल्यात नाही असे भासविणे.
* १३. शरण येण्याची बतावणी करून एकदम आघात करणे.
*१४. शत्रुला पाठलाग करावयास भाग पाडणे.
*१५. लडाइचे क्षेत्र आपल्यास अनुकुल असे निवडून शत्रुला कसेही करून तेथे नेणे.
* १६. शत्रुचे नुकसान करून दरारा निर्माण करणे.
*१७. म्होरक्यास ठार करणे ज्याने शत्रुसैन्यात गोंधळ माजतो.
 
== विसाव्या व एकविसाव्या शतकातील गनिमी युद्धे ==