"ताज महाल पॅलेस हॉटेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या: 19 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q19104
No edit summary
ओळ १:
[[चित्र:800px-Taj_Mahal_Palace_Hotel.jpg|right|thumb|ताज महल् पॅलेस हॉटेल]]
'''ताज महाल पॅलेस अँड टॉवर''' किंवा नुसतेच ताजमहाल होटेल अथवा ताज होटेल [[मुंबई]]च्या [[कुलाबा]] भागातील ऐषारामी होटेल आहे.
 
ताजमहल हे मुंबईतील पंचतारांकित हॉटेल आहे. कुलाब्याजवळ गेट वे ऑफ इंडियाच्या समोर दोन इमारती आहेत. एक ताज महल पॅलेस आणि त्याच्या बाजूलाच एक टोलेजंग इमारत , जरी दोन वेगवेगळया इमारती दिसत असल्या तरी सुध्दा या दोन्ही इमारती टाटा यांच्या मालकीच्या आहेत व त्या ताजमहल हॉटेल म्हणून ओळखल्या जातात. या दोनही इमारतींचे बांधकाम वेगवेगळया कालावधीमध्ये व वेगवेगळया वास्तुशास्त्राज्ञांकडून झालेले आहे.
[[नोव्हेंबर २६]], [[इ.स. २००८]] रोजी दहशतवाद्यांनी येथे हल्ला चढवला होता.
 
जॅकलीन केनेडी, [[बिल क्लिंटन]], हिलरी क्लिंटन, नॉर्वेचे महाराज आणि महाराणी, एडीनबर्गचा डयुक, वेल्सचा राजपुत्र, रॉजर मूर, जॉन कॉलीस, अँजेलीना जॉली, बॅडपीट, हिलरी क्लिंटन, [[बराक ओबामा]].
{{विस्तार}}
 
जगप्रसिध्द व्यक्तींनी ताज पॅलेसला भेट देवून तेथील आदरातिथ्य घेतलेले आहे.
 
==इतिहास==
 
टाटांनी हे ताज हॉटेल उभारण्यामागे जी घटना कारणीभूत झाली ती अशी की, १८६५ मध्ये मुंबईतल्या प्रसिध्द वॉटसन हॉटेलमध्ये तिथल्या दरबानानं जमशेदजींना आत जाण्यास मनाई केली होती. कारण ते हॉटेल फक्त इंग्रजांसाठीच होतं. हा अपमान सहन न झाल्यामुळे टाटांनी भारतीयांसाठी आंतरराष्ट्रीय तोडीचे हॉटेल बांधण्याचा निश्चय केला होता. त्यातूनच ताजची निर्मिती झाली. १६ डिसेंबर १९०३ साली जमशेदजी टाटांमुळे ताज हॉटेलची वास्तू बांधली गेली. काही टिकाकार मात्र या गोष्टीशी सहमत नाही. मुंबईच्या तोडीचं एखाद हॉटेल उभारावं अशी टाईम्स ऑफ इंडियाच्या संपादकाची इच्छा असल्यामुळे त्याच्या आग्रहाखातर टाटांनी हे हॉटेल बांधल असल्याचं त्यांचे मत आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.guardian.co.uk/commentisfree/2008/dec/03/taj-mahal-hotel-mumbai|प्रकाशक=द गार्डीयन (लंडन)|दिनांक=२०१०-०५-२४|शीर्षक=एलन, चार्ल्स (३ डिसेंबर २००८) “ताज हॉटेल संहारातून पुन्हा उभं राहिल”. |भाषा=इंग्लिश}}</ref>
 
 
पहिल्या महायुध्दाच्या वेळेस या हॉटेलचे रुपांतर ६०० पलंगाच्या हॉस्पीटलमध्ये झाले होते. आज जी ताज पॅलेसच्या बाजूची टोलेजंग इमारत दिसते आहे ती अपोलो बंदरामधील हॉटेल 'ग्रीन हॉटेल' म्हणून ओळखले जात होते. स्वस्त किंमतीसाठी आणि रानटी टोळयांच्या मेजवानीच्या कार्यक्रमासाठी हे हॉटेल कुप्रसिध्द होते.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=|प्रकाशक=द एकॉणॉमिक टाइम्स|दिनांक=|शीर्षक=ताज खंड ३२, क्र.३, थर्ड क्वार्टर २००३, फातमा आर झकारीया संपादित. ताज.मॅगझीन@ताजहॉटेल्स.कॉम.|भाषा=इंग्लिश}}</ref> १९७३ मध्ये टाटांनी हे हॉटेल विकत घेउुन त्याच्या जागी आताची टोलेजंग ताज हॉटेलची दुसरी इमारत बांधलेली आहेत.
 
 
बंदराकडून दिसणारी हॉटेलची मागील बाजू आहे. पूर्वेकडे हॉटेलचा दरवाजा आहे. वास्तूशास्त्रज्ञाने तयार केलेला इमारतीचा प्लान बिल्डरच्या लक्षात न आल्यामुळे बंदराकडे हॉटेलची मागील बाजू असल्याचा ब-याच जणांचा मोठा गैरसमज झालेला आहे. परंतू हे खरे नाही. येणा-या अभ्यागतांना त्यांचे सामान वाहतूक करणे सोयीचे जावे या हेतूने हॉटेलचे बांधकाम अशा पध्दतीने झालेले आहे.
 
[[चित्र:800px-Taj_Mahal_Palace_&_Tower.JPG|right|thumb|ताज महल् हॉटेल चे रात्रीचे दृष्य]]
 
==बांधकाम==
ताजमहल हॉटेलचे बांधकाम इंडो सारसेनिक पध्दतीचे असून मूळचे बांधकाम सीताराम खंडेराव वैदय व डी.एन.मिर्झा या भारतीय वास्तूशास्त्रज्ञांनी केलेले आहे व डब्ल्यू.ए.चेंबर्स या इंग्रजी इंजिनीयरनी हे बांधकाम पूर्ण केलेले आहे. भारतामध्ये प्रथमच सरकता जिना या हॉटेलसाठी बसवून वापरण्यात आला होता. हॉटेलमध्ये वापरण्यात आलेली सामुग्री – पंखे, जिने, स्नानगृह.
 
प्रथमच [[अमेरीका]], जर्मन, तुर्कस्तान अशा विविध देशांमधून मागविण्यात आलेली होती. अगदी बटलर सुध्दा इंग्लंडमधून आणले होत. त्याचा घुमट [[आयफेल टॉवर]] साठी वापरलेल्या स्टीलपासून बनविण्यात आला असून हे स्टील त्या वेळी टाटांकडूनच आयात केले जात होते.
 
==भोजन कक्ष ==
ह्या हॉटेल परिसरात उत्तम भोजनालयाचीं काही उपहारगृह<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.cleartrip.com/hotels/info/the-taj-mahal-palace-and-tower-259671|प्रकाशक=क्लियरट्रिप|दिनांक=|शीर्षक=हॉटेलची वैशिष्ट्ये|भाषा=इंग्लिश}}</ref> आहेत, ती पुढीलप्रमाणे:
* झॉडयॅक ग्रील
* शेफ स्टुडीओ
* गोल्डन बेंच
* गोल्डन ड्रॅगन
* वसाबी बाय मोरीमोटो
* ले पेटीसेरी
* शामियाना
* हार्बर बार
* स्टारबोर्ड बार
* मसाला क्राप्ट
* सॉक
* सी लॉज
* ॲक्वॅरीस
* कॉन्टीनेन्टल आणि ईटालियन क्विझीन्स
[[चित्र:800px-Taj_Mahal_Palace_&_Tower_Mumbai.JPG|right|thumb|अरबी समुद्रावरून हॉटेल आणि गेटवे औफ इंडिया चे एक दृश्य.]]
 
==२००८ रोजीचा दहशतवादयांचा हल्ला==
[[२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला]] - त्या हल्ल्याचा परिणाम ताज हॉटेलवरसुध्दा झालेला होता. या हल्ल्यामुळे ताजचं आर्थिक नुकसान झाले होते. <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.guardian.co.uk/world/2008/nov/27/mumbai-terror-attacks|प्रकाशक=द गार्डीयन (लंडन)|दिनांक=२००८-११-२८|शीर्षक=रमेश, रणदीप (२७ नोव्हेंबर २००८) “अजूनही डझनभर लोक दहशवादयांकडे ओलीस”|भाषा=इंग्लिश}}</ref> या हल्ल्याच्या वेळेस काही नागरीकांना दहशतवादयांनी ओलीस ठेवले होते आणि जवळजवळ १६७ नागरीक मृत्यूमुखी पडले होते. त्यात काही परदेशी नागरीकांचा सुध्दा समावेश होता. तीन दिवस चाललेल्या धुमश्चक्रीमध्ये भारतीय कमांडोनी शेवटच्या दिवशी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारामध्ये एका दहशतवादयाचा खात्मा झाला.
 
 
ताज मधील ज्या विभागाचे कमी नुकसान झाले होते ते विभाग दि. २१ डिसेंबर २००८ रोजी पुन्हा सुरू करण्यात आलेले होते. परंतू सर्वांत प्रसिध्द असलेला ऐतिहासिक वारसा असलेला विभाग चालू होण्यास बरेच महिने जावे लागले.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.voanews.com/english/2008-12-21-voa10.cfm|प्रकाशक=वॉइस ऑफ अमेरीका|दिनांक=२००८-१२-२२|शीर्षक=पसरीचा, अंजना (२००९-१२-२१). “हल्ल्यानंतर हॉटेल जनतेसाठी खुले”.|भाषा=इंग्लिश}}</ref>
 
 
जुलै २००९ मध्ये [[भारत]] - अमेरीका संबंध दृढ करण्यासाठी हिलरी क्लिंटन यांनी भारताला भेट दिली होती त्यावेळी या घटनेच्या स्मृत्यर्थ त्यांनी या घटनेमध्ये ज्यांना प्राण गमवावे लागले होते त्या सर्व कर्मचा-यांसाठी व नागरीकांसाठी श्रध्दांजली अर्पित केली. <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.reuters.com/article/newsMaps/idUSTRE56H0ST20090718|प्रकाशक=रुटर्स|दिनांक=|शीर्षक=मोहम्मद , अर्शद (१८ जुलै २००९). “क्लिंटनची मुंबई भेट”.|भाषा=इंग्लिश}}</ref> १५ ऑगस्ट २०१० च्या स्वातंत्र्य दिनी पर्नरचित केलेले ताज महाल हॉटेल नव्याने लोकांसाठी खुले झाले. ६ नोव्हेंबर २०१० रोजी अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे हल्ल्यानंतर हॉटेलला भेट देणारे पहिले परदेशी नागरीक होते. त्यावेळी ताजच्या गच्चीवरून त्यांनी केलेल्या भाषणात ताज हे भारतीयांच्या ताकदीचे व निर्भयपणे घटनेला सामोरी जावून पूर्वस्थितीत येण्याच्या गुणधर्माचे प्रतीक असल्याचे सांगितले.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.reuters.com/article/newsMaps/idUSTRE56H0ST20090718|प्रकाशक=लॉस एंजलीस टाईम्स|दिनांक=२०११-०७-०४|शीर्षक="ओबामांची मुंबईला भेट".|भाषा=इंग्लिश}}</ref>
 
==साहित्य==
विल्यम वॉरेन, जी गॉचर (२००७). एशियाज लिजेंडरी हॉटेल : दि रोमान्स ऑफ ट्रॅव्हल. सिंगापूर : पेरीप्लस एडीशन. आयएसबीएन ९७८-०-७९४६-०१७-४.
भारतीय लेखक सुलतान रशीद मिर्जा व फरहात उल्ला बैंग यांच्या साहब “ बहादुर ” या लघुकथेत आणि वेद मेहता यांच्या “ डेलीक्यूएंट चाचा ” या कादंबरीमध्ये नमूद केलेले आहे.
एका शाळकरी मुलाचे या ठिकाणी भेट देण्याचे स्वप्न कसे असा विषय असलेला “ ता-यांचे बेट ” या मराठी चित्रपटामध्ये या ठिकाणाचे वर्णन नमूद केलेले आहे.
 
== संदर्भ व नोंदी ==
 
{{संदर्भसूची|2}}
{{टाटा समूह}}
[[वर्ग:मुंबई]]
 
[[वर्ग:टाटा उद्योगसमूह]]
[[he:מתקפת הטרור במומבאי (2008)#מלון טאג' מאהל]]
[[वर्ग:मुंबई]]