"पर्यटन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
इंग्रजी विकिपीडियातल्या Tourism लेख वापरून विस्तार
छोNo edit summary
ओळ १:
पर्यटन ही संज्ञा प्रवास (टूर) या शब्दाशी संबंधित आहे आणि प्रवास (टुर) हा शब्द लॅटीन भाषेतील TORNOS या शब्दापासून आलेला आहे. त्याचा मूळ अर्थ वर्तुळ असा आहे. याच शब्दापासून पुढे वर्तुळाकार प्रवास किंवा पॅकेज टूर्स हा शब्द रुढ झाला.
 
<ref>[http://en.wikipedia.org/wiki/Tourism इंग्रजी विकिपीडियातला Tourism हा लेख]</ref>मनोरंजन, फुरसत किंवा कामासाठी केलेला प्रवास म्हणजेच पर्यटन. जागतिक पर्यटन संस्था (World Tourism Organization) ही 'जेव्हाजे लोक प्रवास करून आपल्या परिसराबाहेरील जागी जाउन सलग १ वर्षापेक्षा कमी काळ मनोरंजन, काम वा इतर कारणांसाठी रहातात ते' अशी पर्यटकांची व्याख्या करते.<ref >[http://pub.unwto.org/WebRoot/Store/Shops/Infoshop/Products/1034/1034-1.pdf पर्यटन खर्चाच्या आकडेवारीचे संग्रहण]</ref>
 
पर्यटन ही जगभरात फुरसतीचा वेळ घालविण्याचे एक साधन म्हणून अतिशय लोकप्रिय झाली आहे. २००० शतकाच्या शेवटी आलेल्या जागतीक मंदीने व H1N1 फ्लुच्या साथीने २००८ च्या मध्यापासून ते २००९ च्या अखेरपर्यंत रोडावलेल्या पर्यटनाला परत बरे दिवस आले असून २०१२ मध्ये जागतिक पर्यटकांच्या संख्येने १०० कोटीचा पल्ला इतिहासात पहिल्यांदा ओलांडला. आंतरदेशीय पर्यटन उत्पन्न (आंतरदेशीय देणे जमाखात्यातले पर्यटनावरचे उपखाते) २०११त १.०३ लाख कोटी अमेरिकन डॉलर (७४ हजार कोटी युरो) इतके वाढले. ते २०१० च्या तुलनेत ३.८% अधिक होते. २०१२त चीन जगातील पर्यटनावर सर्वात जास्त खर्च करणारा देश बनला आणि त्याने अमेरिका व जर्मनी यांना त्याबाबतीत मागे टाकले. चिन व उदयोन्मुख राष्ट्रे (रशिया व ब्राझील ठळकपणे) ह्यांचा पर्यटनावरचा खर्च गेल्या दशकात लक्षणीय वाढला आहे.<ref>[http://media.unwto.org/en/press-release/2013-04-04/china-new-number-one-tourism-source-market-world चीन - जगातली पर्यटनासाठी प्रथम क्रमांकाची बाजारपेठ]</ref>
"https://mr.wikipedia.org/wiki/पर्यटन" पासून हुडकले