"पोर्तुगीजांच्या भारतीय वसाहती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४८:
पेड्रो अल्वारेझ कॅब्रलच्यानंतर पोर्तुगालची तिसरी व्यापारी मोहीम जोआस द नोव्हा याच्या नेतृत्वाखाली पोर्तुगालहून निघाली. इ.स. १५०१ सालीच तो कालिकतला पोहोचला. कालिकतला आल्यावर झामोरीनने जोआस द नोव्हा आणि त्याच्या सहकारी व्यापार्यांप्रती सहानुभूती दाखवून त्यांना त्याच्या प्रजेशी शांततेने व्यापार करण्याची परवानगी दिली.
 
पोर्तुगालची चौथी व्यापारी मोहीम वास्को द गामाच्या नेतृत्वाखाली निघाली. तो दिनांक २९ आॅक्टोबर, इ.स. १५०२ साली दुसऱ्यांदा कालिकत बंदरात उतरला. यावेळी त्याने त्याच्यासोबत वीस मोठी जहाजे व शस्त्रसज्ज नौदल सोबत आणले होते. आल्यावर त्याने कालिकतच्या शासकाच्या मर्जीविरुद्ध कालिकत, कोचीन आणि कण्णूर येथे व्यापारी केंद्रे सुरू केली. वास्को द गामाच्या या दुसऱ्या मोहिमेवेळी सगळ्या मलबार किनाऱ्यावर जी लहान-लहान राज्ये होती, ती सरंजामदार प्रमुखांच्या ताब्यात होती. पोर्तुगीजांच्या विस्तारवादाला आळा घालू शकेल असा एकही प्रबळ राजा त्यावेळी संपूर्ण मलबार किनाऱ्यावर नव्हता. पोर्तुगीजांजवळ भारतीयांपेक्षा प्रभावी शस्त्रे होती व त्यांची जहाजेही समुद्रातील भारतीय जहाजांपेक्षा जास्त शक्तिशाली होती. व्यापाराच्या माध्यमातून संपत्ती अर्जित करणे आणि धर्मप्रसार करणे ही उद्दिष्ट्ये घेऊनच पोर्तुगालने भारतातील व्यापारी मोहिमा काढल्या होत्या.
 
== पारिभाषिक शब्दसूची ==