"पोर्तुगीजांच्या भारतीय वसाहती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ४६:
पोर्तुगीजांनी त्यांची पहिली वखार कालिकत येथे झामोरीनच्या रीतसर परवानगीने बांधली. पो्तुगीजांच्या आधी काही अरब व्यापारीही कालिकत येथे झामोरीनच्या परवानगीने व्यापारासाठी आलेले होते आणि त्यांना झामोरीनच्या दरबारी चांगला मान होता. पण पोर्तुगीजही कालिकत येथे व्यापारासाठी आल्याने व झामोरीनने त्यांना तशी परवानगी दिल्याने अरबांच्या कालिकत येथून आशिया व युरोपदरम्यान चालणार्या व्यापाराच्या एकाधिकाराला धक्का बसला. परिणामी अरब आणि पोर्तुगीज व्यापार्यात तंटे चालू झाले. अरबांना झामोरीनकडे मान होता. झामोरीनने त्याच्या राज्यात शांतता राखण्यासाठी पोर्तुगीजांनाच खडसावले. त्यामुळे पोर्तुगीजांनी कालिकत आणि कोचीनच्या राज्यात गोंधळ माजविण्याचा प्रयत्न केला. यामुळे जो संघर्ष उद्भवला त्यात कॅब्रल आणि त्याच्या साथीदारांचा पराभव झाला. त्यामुळे पेड्रो अल्वारेझ कॅब्रलला इ.स. १५०१ साली पोर्तुगालला परतावे लागले. जाताना त्याच्याजवळ त्याची केवळ पाच जहाजे शिल्लक राहिलेली होती. जाताना त्याची ही पाचही जहाजे भारतीय मालाने काठोकाठ भरलेली होती. पोर्तुगालला गेल्यानंतर त्यातून त्याला खूप मोठा नफा मिळाला.
 
पेड्रो अल्वारेझ कॅब्रलच्यानंतर पोर्तुगालची तिसरी व्यापारी मोहिम जोआस द नोव्हा याच्या नेतृत्वाखाली पोर्तुगालहून निघाली. इ.स. १५०१ सालीच तो कालिकतला पोहोचला. कालिकतला आल्यावर झामोरीनने जोआस द नोव्हा आणि त्याच्या सहकारी व्यापार्यांप्रती सहानुभूती दाखवून त्यांना त्याच्या प्रजेशी शांततेने व्यापार करण्याची परवानगी दिली.
 
== पारिभाषिक शब्दसूची ==