"पोर्तुगीजांच्या भारतीय वसाहती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
ओळ ४४:
पोर्तुगीजांनी केप मार्गाचा शोध लावल्याने भारताकडे जाणार्या नवीन सागरी मार्गाचा वापर करणारे पोर्तुगाल हे पहिले पश्चिम युरोपिय राष्ट्र ठरले. वास्को द गामाच्या भारतातील यशस्वी मोहिमेनंतर पेड्रो अल्वारेझ कॅब्रल याच्या नेतृत्वाखाली पोर्तुगालने दुसरी व्यापारी मोहिम काढली. तो पोर्तुगालची राजधानी [[लिस्बन]] येथून १३ जहाजांमधून १२०० खलाशांचा तांडा [[९ मार्च]], [[इ.स. १५००]] रोजी भारताकडे निघाला. पुढे सागर सफरीत वाईट हवामानामुळे जहाजांचा हा काफिला भरकटला व [[ब्राझिल]]कडे गेला. तिथून तो भारताकडे वळला आणि [[१३ सप्टेंबर]], इ.स. १५०० रोजी कालिकत येथे पोहोचला.
 
पोर्तुगीजांनी त्यांची पहिली वखार कालिकत येथे झामोरीनच्या रीतसर परवानगीने बांधली. पो्तुगीजांच्या आधी काही अरब व्यापारीही कालिकत येथे झामोरीनच्या परवानगीने व्यापारासाठी आलेले होते आणि त्यांना झामोरीनच्या दरबारी चांगला मान होता. पण पोर्तुगीजही कालिकत येथे व्यापारासाठी आल्याने व झामोरीनने त्यांना तशी परवानगी दिल्याने अरबांच्या कालिकत येथून आशिया व युरोपदरम्यान चालणार्या व्यापाराच्या एकाधिकाराला धक्का बसला. परिणामी अरब आणि पोर्तुगीज व्यापार्यात तंटे चालू झाले. अरबांना झामोरीनकडे मान होता. झामोरीनने त्याच्या राज्यात शांतता राखण्यासाठी पोर्तुगीजांनाच खडसावले. त्यामुळे पोर्तुगीजांनी कालिकत आणि कोचीनच्या राज्यात गोंधळ माजविण्याचा प्रयत्न केला.
 
== पारिभाषिक शब्दसूची ==