"पोर्तुगीजांच्या भारतीय वसाहती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 28 langlinks, now provided by Wikidata on d:Q323904
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
ओळ ३१:
 
[[वास्को दा गामा]] याने युरोपातून भारताकडे येण्याच्या सागरी मार्गाच्या शोध लावल्यानंतर सहा वर्षांनी, म्हणजे [[इ.स. १५०५]] साली केरळातील [[कोची]] येथे [[फ्रान्सिस्को द अल्मीडा]] याच्या पहिला पोर्तुगीज व्हाइसरॉय म्हणून झालेल्या नेमणुकीपासून भारतातील पोर्तुगीज सत्तेला आरंभ झाला. [[इ.स. १५१०]] साली पोर्तुगीज भारताचे मुख्य ठाणे [[गोवा|गोव्यात]] हलवण्यात आले. [[इ.स. १७५२]] सालापर्यंत [[आफ्रिका]] खंडाच्या दक्षिणेपासून [[आग्नेय आशिया|आग्नेय आशियापर्यंत]], अश्या [[हिंदी महासागर|हिंदी महासागरातील]] सर्व पोर्तुगीज वसाहतींना ''पोर्तुगीज भारत'' या संज्ञेने उल्लेखले जाई. [[इ.स. १७५२]] साली [[मोझांबिक|मोझांबिकास]] अलग करून स्वतंत्र वसाहतीचा दर्जा देण्यात आला. [[इ.स. १८४४]] साली पोर्तुगीज भारताच्या शासनाने [[मकाव]], [[सोलोर]] व [[तिमोर]] येथील वसाहतींना प्रशासकीय कक्षेतून वगळल्यानंतर पोर्तुगीज भारताची व्याप्ती गोवा व मलबारापुरती सीमित राहिली. [[इ.स. १९५४]] साली [[दादरा आणि नगर हवेली]] भारतीय प्रजासत्ताकाने पोर्तुगीज भारताच्या ताब्यातून मिळवले, तर [[इ.स. १९६१]] सालातील डिसेंबरात [[गोवा]], [[दीव]] व [[दमण]] या अखेरच्या तीन वसाहतीही ताब्यात घेतल्या. पोर्तुगीज भारताच्या वसाहती भारतीय प्रजासत्ताकात सामील झाल्या, तरीही या सामिलीकरणास पोर्तुगाल शासनाची मान्यता [[इ.स. १९७५]] साली मिळाली.
 
== इतिहास ==
[[इ.स. १४९७]] साली [[पोर्तुगाल]]चा राजा इमॅन्युअलने [[आफ्रिका खंड|आफ्रिका खंडाला]] प्रदक्षिणा घालण्याची मोहिम आखली. या मोहिमेची जबाबदारी त्याने पोर्तुगीज दर्यावर्दी [[वास्को दा गामा|वास्को द गामा]] याच्यावर सोपवली. चार जहाजे आणि एकशे सत्तर प्रशिक्षित खलाशी घेऊन वास्को द गामा मोहिमेवर निघाला.
 
== बाह्य दुवे ==