"मेंढी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 135 langlinks, now provided by Wikidata on d:Q7368
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
ओळ २:
 
'''मेंढी''' हा एक [[चतुष्पाद]] पाळीव प्राणी आहे. हा मुळात [[युरोप]] व [[आशिया]] या खंडांचा रहिवासी आहे. मेंढ्यांच्या अंगावर केसाळ कातडी असते. ते केस म्हणजेच लोकर.
मेंढीची [[लोकर]] हे मेंढीपासून मिळणारे महत्त्वाचे उत्पादन आहे. त्या साठीत्यासाठी मेंढ्या पाळण्याचा उद्योगव्यवसाय केला जातो. मेंढ्यांचे मांसही खाल्ले जाते. मेंढ्याच्या मांसाला मराठीत बोलाईचे मटण असे म्हणतात.<br />
मेंढपाळ मेंढीचे [[दूध]] पिण्यासाठी उपयोगात आणतात.
 
ओळ २१:
 
== प्रजाती ==
भारतात मेंढ्यांच्या विविध ३९ जाती आढळतात. भारतीय मेंढ्यांचे भौगोलिक प्रदेशानुसार चार विभाग केले आहेत. <br />
भारतात सर्वसाधारणपणे सर्वत्र आढळणारी [[बकरी]] हा पण मेंढीच्या जातीतलाच एक प्रकार आहे.
* हिमालयीन पर्वतरांगांत (जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड) काश्मिरी, गद्दी, भाकरवाल, रामपूर-भुशियार, गुरेझ, कर्नाह या प्रमुख जाती आढळतात. काश्मिरी व कर्नाह या जाती उच्च प्रतीच्या लोकर उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत.
* भारताच्या उत्तर-पश्चिम भागात (हरियाणा, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश) हिस्सार डेल, मारवाडी, मागरा, लोही, नाली, काठेवाडी, सोनाडी, पाटणवाडी, कच्छी, चौकला या मेंढ्यांच्या जाती आढळतात.
* भारताच्या दक्षिण विभागात (महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू) दख्खनी, नेल्लोर, माडग्याळ, बेल्लारी, मद्रासरेड, मेंचेरी या प्रमुख जाती आढळतात. यांपकी माडग्याळ, नेल्लोर, मेंचेरी व मद्रास रेड या मेंढ्यांच्या जाती मांस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत.
* भारताच्या पूर्व विभागात (बिहार, पश्चिम बंगाल, ओरिसा आणि उत्तर पूर्व भारत) छोटा नागपुरी, शहाबादी, गरोल, गंजाम, तिबेटल या जाती आढळतात. दख्खनी, बेल्लारी, मारवाडी, सोनाडी, शहाबादी, छोटा नागपुरी, गंजाम या मेंढ्यांच्या जाती लोकर व मांस या दुहेरी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत.
* भारतात सर्वसाधारणपणे सर्वत्र आढळणारी [[बकरी]] हा पण मेंढीच्या जातीतलाचजातीतला एक प्रकार आहे.
 
==महाराष्ट्रातील जाती==
महाराष्ट्रात मेंढ्यांच्या दख्खनी व माडग्याळ या दोनच प्रमुख जाती आढळतात. दख्खनच्या पठारावर आढळत असल्याने दख्खनी मेंढी हे नाव पडले. संगमनेरी, लोणंद, सोलापुरी, कोल्हापुरी या दख्खनी मेंढींच्या चार उपजाती आहेत. दख्खनी मेंढी उष्ण हवामानात, कमी चारा असलेल्या दुष्काळी प्रदेशात पाळण्यास उपयुक्त असून मांस व लोकर उत्पादनासाठी पाळतात. माडग्याळ मेंढय़ा सांगली जिल्ह्य़ातील जत तालुक्यातील कवठेमहांकाळ, रांजणी, माडग्याळ व सिद्धनाथ या भागात जास्त आढळतात. माडग्याळ गावाच्या नावावरूनच या मेंढ्यांना हे नाव पडले.
 
==परदेशी जाती==
मेंढ्यांच्या विदेशी जातींमध्ये मेरिनो, रॅमब्युलेट, चेव्हिओट, कॉरिडेल, डॉरसेट, साऊथ-डाऊन, पोलवर्थ, सफॉल्क विशेष प्रसिद्ध आहेत. मेरिनो मेंढीचे उगमस्थान स्पेन असून उच्च प्रतीच्या लोकर उत्पादनासाठी ती जगप्रसिद्ध आहे. संकरीकरणाद्वारे स्थानिक मेंढ्यांचे लोकर उत्पादन व प्रत सुधारण्यासाठी मेरिनो नरांचा विविध देशांत वापर केला जातो. सफॉल्क, डॉरसेट, साऊथ-डाऊन मेंढ्यांचे उगमस्थान इंग्लंड असून त्या मांस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत.
 
 
== मेंढ्यांचे अन्न ==
मुख्यतः [[चारा]] तसेच झाडांची कोवळी पाने.
"https://mr.wikipedia.org/wiki/मेंढी" पासून हुडकले