"ना.घ. देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो (वर्ग:इ.स. २००० मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.)
छोNo edit summary
 
== जीवन ==
ना.घ. देशपांड्यांचा जन्म २१ ऑगस्ट इ.स. १९०९ रोजी झाला. या दिवशी नागपंचमी होती, म्हणून नाव नागोराव ठेवण्यात आले. त्यांना लहानपणापासूनच कविता करण्याचा छंद होता. चित्रकलेचेही उत्तम अंग होते. व्यवसायाने ते वकील होते. इ.स. १९३० साली त्यांनी मॉरिस कॉलेजातून बी.ए. पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनत्यांनी कायद्याचा अभ्यासक्रम पुरा करून एल.एल.बी. पदवी कमवली. बी.ए.ला असताना इ.स. १९२९ साली त्यांनी लिहिलेली ''शीळ'' ही कविता वर्गमित्र गायक गोविंदराव जोशी (जे पुढे जी.एन. जोशी या नावाने प्रसिद्ध झाले) यांनी कार्यक्रमांमधून गायला सुरुवात केली. ती अतिशय लोकप्रिय झाली. पुढे इ.स. १९३२ साली एच.एम.व्ही.ने ती जी.एन.जोश्यांच्याच आवाजात ध्वनिमुद्रित केली. यातून ''भावगीत'' हा प्रकार मराठी संगीतक्षेत्रात रूढ झाला. इ.स. १९५४ साली ''शीळ'' याच नावाने त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. इ.स. १९६४ साली ''अभिसार'' हा नाघंचा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. त्याला महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक मिळाले. पुढे इ.स. १९८६ साली प्रकाशित झालेल्या ''ख़ूणगाठी'' या काव्यसंग्रहास [[साहित्य अकादमी पुरस्कार]] देऊन गौरवण्यात आले.
 
याशिवाय ''कंचनीचा महाल'' (चार दीर्घकवितांचा संग्रह) व ''गुंफण'' (''शीळ'' काव्यसंग्रहाच्या काळापासून तोवर अप्रकाशित राहिलेल्या कवितांचा संग्रह) यांचाही त्यांच्या ग्रंथसंपदेत समावेश होतो. इ.स. १९८०च्या दशकात ''कोल्हापूर सकाळ'' दैनिकात प्रसिद्ध झालेल्या आठवणींचे ''फुले आणि काटे'' हे संकलन प्रकाशित झाले.
२९,७८९

संपादने