"च-च्यांग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 68 langlinks, now provided by Wikidata on d:Q16967
भूगोलविषयक माहिती भरली.
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ ८:
| देश = चीन
| राजधानी = [[हांगचौ]]
| क्षेत्रफळ = १,०१,८००
| लोकसंख्या = ५,४४,२६,८९१
| घनता = ५३०
| वेबसाईट = http://www.zj.gov.cn/
}}
'''च-च्यांग''' (देवनागरी लेखनभेद : '''चच्यांग''', '''चेज्यांग''', '''चज्यांग''' ; [[चिनी भाषा|चिनी]]: 浙江; [[फीनयीन|फीनयिन]]: Zhèjiāng; ) हा [[चीन]] देशाच्या पूर्व किनार्‍यावरील प्रांत आहे. याच्या उत्तरेस [[च्यांग्सू]] प्रांत व [[षांघाय]] नगरपालिका, [[वायव्य|वायव्येस]] [[आंह्वी]], पश्चिमेस [[च्यांग्शी]], दक्षिणेस [[फूच्यान]] हे चिनाच्या जनता-प्रजासत्ताकाचे प्रांत असून याच्या पूर्वेस [[पूर्व चीन समुद्र]] पसरला आहे. [[हांगचौ]] येथे च-च्यांगाची राजधानी आहे.
 
== भूगोल ==
च-च्यांगाचा बहुतांश - म्हणजे जवळजवळ ७० % - मुलूख डोंगराळ आहे. विशेषकरून प्रांताच्या दक्षिण व पश्चिम भागांत डोंगरांच्या रांगा पसरल्या आहेत. यांदांग पर्वतरांगा, थ्यॅन्मू पर्वतरांग, थ्यॅन्ताय पर्वत, मोगान पर्वत या ७०० ते १,५०० मी. उंचीच्या डोगरांनी व डोंगररांगांनी हा भाग व्यापला आहे. ''ह्वांगमाओच्यान शिखर'' (उंची १,९२९ मी., म्हणजे ६,३२९ फूट) हे च-च्यांगातील सर्वांत उंच शिखर प्रांताच्या नैऋत्य भागातच आहे.
 
[[छ्यांग्तांग नदी|छ्यांग्तांग]] व [[औ नदी|औ]] या च-च्यांगातील प्रमुख नद्या आहेत. या नद्यांची खोरी प्रांताच्या डोंगराळ भागात आहेत. उत्तर च-च्यांगाचा भूप्रदेश [[यांगत्से त्रिभुज प्रदेश|यांगत्से त्रिभुज प्रदेशाच्या]] दक्षिणांगास लागून आहे. [[हांग्चौ]], [[च्याशिंग]], [[हूचौ]] इत्यादी शहरे असलेला हा भूप्रदेश, तसेच च-च्यांगाचा किनारी भाग काहीसा सखल आहे. च-च्यांगाच्या किनारपट्टीलगत सुमारे ३,००० छोटी छोटी बेटे असून [[चौषान बेट]] हे मुख्यभू चिनातले तिसरे मोठे ([[हायनान]] व छोंगमिंग बेटांखालोखाल) बेट च-च्यांगाच्या किनाऱ्यालगतच आहे.
 
च-च्यांगाचे हवामान दमट उपोष्णकटिबंधीय प्रकारात मोडते. येथील हवामानात चार ऋतू स्पष्टपणे प्रत्ययास येतात. मार्चात वसंतास सुरुवात होते. वसंतकाळातले हवामान लहरी असते, तसेच या काळात थोड्या पावसाचीही शक्यता असते. जून ते सप्टेंबर महिन्यांतल्या ग्रीष्म ऋतूत हवामान उष्ण, दमट असते; तसेच या काळात पाऊसही पडतो. त्यानंतरच्या शरद ऋतूतले हवामान कोरडे, ऊबदार, निरभ्र असते. शिशिर किंवा हिवाळा थंडीचा असला तरी अल्पावधीचा असतो. वार्षिक सरासरी तापमान १५° ते १९° सेल्सियस असून जानेवारीतले सरासरी तापमान २° ते ८° सेल्सियस असते, तर जुलैतले सरासरी तापमान २७° ते ३०° असते. वार्षिक पर्जन्यमान सहसा १,००० ते १,९०० मि.मी. असते.
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/च-च्यांग" पासून हुडकले