"राम जगन्नाथ जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १०:
रामजोशींचा बारामतीला बाबुजी नाइकांच्या वाड्यात तमाशा होता. त्यावेळी त्यांनी गायलेल्या ’भला जन्म हा तुला लाधला’ आणि ’दो दिवसांची तनु ही साची’ या दोन वैराग्यपर कवनांनी तिथे असलेले [[मोरोपंत]] संतुष्ट झाले. त्या दिवसापासून [[मोरोपंत]] आणि रामजोशी यांच्यामध्ये एकमेकांविषयी आदर व स्नेह वाटू लागला, आणि उत्तरोत्तर तो वाढतच गेला. रामजोशींनी मोरोपंतांच्या आर्या आपल्या कीर्तनांतून लोकप्रिय केल्या. या पुढील काळातील रामजोशींच्या काव्यरचनेवर मोरोपंतांची बरीच छाप आहे.
 
संस्कृताध्ययन, यमक-अनुप्रासांची लयलूट, संस्कृत-प्राकृत शब्दांच्या मिश्रणाने घडून आलेली भाषेची सजावट, शीघ्रकवित्व, समयसूचकताआणिसमयसूचकता आणि प्रभावी वक्तृत्व आदी गुणांमुळे रामजोशी यांची कीर्तने अतिशय लोकप्रिय झाली. एकदा एकत्यांचे कीर्तन ऐकून एका सावकाराने त्यांना ५ हजाराचे बक्षीस दिले.
 
शंकराचार्यांनी रामजोशींना बहिष्कृत करावे असा पुण्यातील कर्मठ ब्राह्मणांचा आग्रह होता. परंतु शंकराचार्यांसारख्या पुरुषाला रामजोशींनी आपल्या विद्वत्तापूर्ण भाषणाने आणि काव्यरचनेने संतुष्ट केले. दुसऱ्या बाजीरावाच्या काळात पुण्यात काशीरामेश्वरपर्यंत ज्यांचा लौकिक पसरला होता असे नीलकंठशास्त्री थत्ते नावाचे एक याज्ञिक पंडित होते. पुण्यातील काही विघ्नसंतोषी लोकांनी ज्या सभेत नीलकंठशास्त्री आहेत, तेथेच रामजोशींचे कीर्तन ठेवले. ते जाणून रामजोशींनी यज्ञशास्त्राची जमेल तितकी माहिती गोळा केली, आणि त्या सभेत त्या माहितीचा उपयोग करून बसविलेल्या लावण्या कटिबंधाच्या चालीवर म्हटल्या. त्या ऐकून थत्तेशास्त्रींनी खुश होऊन आपल्या अंगावरची शाल रामजोशींना पांघरून त्यांचा गौरव केला.