"द्रौपदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ ५:
द्रोणाचार्य यांनी द्रुपद राजास युद्धात हरवुन अर्धे राज्य घेतल्यामुळे [[द्रोणाचार्य|द्रोणाचार्यांचा]] वध करण्यासाठी पुत्रप्राप्तीच्या इच्छेने केलेल्या पुत्रकामेष्टी यज्ञाच्या ज्वाळांमधून द्रौपदी व धृष्टध्युम्न ही जुळी बहीण भावंडे बाहेर आली. ही बहीण भावंडे कुमारवयीन होती. धृष्टध्युम्न व द्रौपदी यांना अयोनिसंभव असे म्हणत - म्हणजे स्त्रीच्या गर्भाशयातून ज्यांचा जन्म झाला नाही असे. द्रुपदाची कन्या म्हणून तिला द्रौपदी असे म्हणत पण तिचे खरे नाव कृष्णा होते व ते तिच्या सावळ्या रंगामुळे पडले होते. तिच्या शरीरास कमळासारखा सुगंध येत असे. तिच्या सौंदर्याची स्तुती दूरवर पसरलेली होती. तिला कल्याणी असे देखील म्हटले जात असे.
 
द्रौपदीला आणखीही काही नावे होती. बर्‍याचदाबरेच वेळा असा गैरसमज करून घेतला जातो की द्रौपदीचा पाच पांडवांशी विवाह झाला, म्हणून तिला पांचाली म्हणतात. खरे तर ती [[पांचाल]] राज्याची राजकन्या म्हणून तिला पांचाली म्हटले जात असे. यज्ञातून उत्पन्न झाली म्हणून तिला याज्ञसेनी असे देखील म्हटले जाई.
 
द्रौपदी [[शिखंडी]]ची बहीण होती. [[कृष्ण]] हा दौपदीचा सखा होता. द्रौपदी जेव्हा उपवर झाली तेव्हा सम्राट द्रुपदाने कृष्णाच्याच सल्ल्याने तिच्या विवाहासाठी एक पण आयोजित केला होता. छताला लावलेल्या माशाचे प्रतिबिंब जमिनीवर पाण्याने भरलेल्या कुंडात पडेल, अशी व्यवस्था केली गेली होती. पाण्यातील माशाचे प्रतिबिंब पाहून जो कुणी माशाचा डोळा नेम धरून फोडेल, त्यालाच द्रौपदी वरेल, असा तो पण होता. अर्जुनाने हा पण जिंकला होता. मात्र कुंतीच्या तोंडून अनावधानाने निघालेल्या शब्दांमुळे द्रौपदीला अर्जुनासोबत इतर चार पांडवांनादेखील वरावे लागले.
"https://mr.wikipedia.org/wiki/द्रौपदी" पासून हुडकले