"नटसम्राट (नाटक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,६४२ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
 
== कलाकार ==
या नाटकातील ''नटसम्राट'' गणपतराव ऊर्फ अप्पासाहेब बेलवलकर ही प्रमुख भूमिका डॉ. [[श्रीराम लागू]] यांनी अनेक वर्षे रंगवली. ही भूमिका करण्याची संधी मिळणे ही मराठी नाट्याभिनेत्यांची उत्कट इच्छा असते. ही भूमिका करणे म्हणजे शिवधनुष्य पेलणे असे समजले जाते. श्रीराम लागूंनंतर [[सतीश दुभाषी]], [[उपेंद्र दाते]], [[यशवंत दत्त]], [[चंद्रकांत गोखले]], [[दत्ता भट]], [[मधुसूदन कोल्हटकर]], [[राजा गोसावी]], [[गिरीश देशपांडे]] हेही नटसम्राट अप्पासाहेब बेलवलकर झाले होते.
 
नटसम्राट हे नाटक मुळात विल्यम शेक्सपियरच्या एकाहून अधिक अजरामर कलाकृतींवर बेतले होते. मूळ नाटकाचेनाट्यांशांचे ते भाषांतर किंवा रूपांतर नाही. असे असले त्या कथानकांना वि.वा.शिरवाडकरांनी आपल्या प्रतिभेने विस्तारले आणि मराठीत एक एकमेवाद्वितीय नाटक अवरतरले. या नाटकाला रंगभूमीवर येऊन दशके लोटली, पण नाटकाचे नावीन्य अजून ओसरलेले नाही.
 
==नटसम्राटचे सलग आठ प्रयोग==
 
या नाटकाच्या प्रयोगात अप्पासाहेब बेलवलकारांची भूमिका करणाऱ्या नटाला मानसिक थकवा येतो. असे असून २७ ऑगस्ट २०१३ या दिवशी सकाळी पावणेसहा वाजता सुरू झालेले आणि एकापाठोपाठ सलग चाललेले ’नटसम्राटचे’ एकाच नटसंचातले एकूण आठ प्रयोग २८ ऑगस्टच्या दुपारी दीड वाजता संपले. हे प्रयोग पुण्याच्या बालगंधर्व मंदिरात एकूण ३१ तास ४५ मिनिटे चालले होते. हा बहुधा जागतिक विक्रम असावा. ’तीर्थराज’, ’रंगमैत्री’ आणि [[दादा कोंडके]]फाउंडेशन यांनी हे प्रयोग रंगमंचावर सादर केले होते. [[गिरीश देशपांडे]] यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले होते व अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिकाही केली होती.
 
== माध्यमांतर ==
५७,२९९

संपादने