"वामन पंडित" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
{{संदर्भयादी}}
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ९:
{{विकिकरण}}
महाराष्ट्रीय ज्ञानकोशानुसार वामन पंडितांची गणना उच्च दर्जाच्या कवीत होते. यमकें लांब लांब साधण्यांत याचें कौशल्य दिसून येतें. म्हणून यास यमक्या वामन असेंहि म्हणतात. याचें कांहीं भाषांतररुप काव्य आहे व कांहीं स्वतंत्र आहे. भर्तृहरीचीं श्रृंगार, नीति वैराग्य शतकें, गंगालहरी, समश्लोकी गीता हीं भाषांतरित होय. निगमसागर नांवाचा वेदांतपर ग्रंथ त्यानें लिहिला आहे. त्यानंतर, 'यथार्थदीपिका' या नांवाची गीतेवरील टीका अनेक लोकांच्या सूचनेवरुन त्यानें लिहिली. व तींत आंधळी भक्ति ही कुचकामाची असून ज्ञानयुक्त सगुण भक्तीच श्रेष्ठ व मोक्षसाधनाचा उत्तम मार्ग म्हणून प्रतिपादिलें आहे. या ग्रंथाची ओवीसंख्या २२ हजारांवर आहे. ओवीरचना अनियमित असून ती कोठें लांब तर कोठें आंखुड झाली आहे. याशिवाय, रामजन्म, कंसवधं, हरिविलास, आर्याटीका, कात्यायनीव्रत, अनुभूतीलेश, जलक्रीडा, जटायुस्तुति अशीं इतर पुराणप्रसंगांवर त्यानें काव्यें केलीं आहेत. 'सुश्लोक वामनाचा' असें मोरोपंतांनीं म्हटलें आहे. यावरुन वामनपंडिताची योग्यता दिसून येते. निवृत्तिपर काव्यांत जशी याची प्रसिध्दि आहे तशीच शृांगर, वात्सल्य, करुण, वगैरे नवरसपूर्ण काव्यहि यानें केलें आहे. वर्णनशैली, रचनाचातुर्य, साधेपणा, व प्रसाद याच्या काव्यांत जागजागीं दिसून येतो. यानें आपल्या बायकोस उपदेश करण्याकरितां लिहिलेलें प्रियसुधा नांवाचें प्रकरण फार उत्तम वठलें आहे. <ref>http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-45-30/10434-2013-03-05-04-52-44</ref>
 
==उत्तर(वर्तमान)कालीन टिका==
मराठी साहित्यिक [[नामदेव ढसाळ]] यांच्या मतानुसार संतसाहित्या नंतरच्या मराठी काव्याचा टप्पा पडिंती काव्याचा येतो ज्याची सुरवात वामन पंडिता पासून होते.( संतांच्या नंतर आलेल्या वामन पंडित, मोरोपंत, रघुनाथ पंडित, विठ्ठल नागेश सामराज या ) पंडित कवींनी संस्कृत साहित्यातला अभिजातवाद मराठी भाषेवर व साहित्यावर लादून ठेवला. हे ओझे मराठीच्या देहावरून अजूनही खाली उतरायला तयार नाही. <ref>[http://www.saamana.com/2013/January/05/Samashti.htm दैनिक सामना संकेतस्थळावरील साहित्यिक नामदेव ढसाळ यांचा लेख (सदर: सर्वकाही समष्टीसाठी ) लेख: मुजोरी : ३ अभिजनांच्या वाङ्मयीन अधिसत्तेची (लेख तारीख ५ जानेवारी २०१३ ?)] हा लेख दिनांक २५ सप्टे २०१३ रात्रौ १० वाजता जसा अभ्यासला</ref>
==जन्म आणि निधन==
जन्म [[नांदेड]] {{संदर्भ हवा}} निधनकाल वै.शु. (शक १६१७) मानतात. समाधिस्थान वांईजवळ [[कमळगड|भोगांव (भोमगाव ?)]] नांवाच्या खेडयांत आहे.<ref>http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-45-30/10434-2013-03-05-04-52-44</ref>