"साल्व्हादोर दाली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३६:
 
== चित्रकृती ==
इ.स. १९२७ साली साल्वादोरने `हनी इज स्वीटर दॅन ब्लड' हे आपले पहिले अस्तित्ववादी चित्र रेखाटले. `इल्यूमिड प्लेझर्स' या त्याच्या चित्रकृतीत त्याने परस्परविसंगत जटिल प्रतिमांच्या गर्दीत स्त्रीवर अतिप्रसंग करणार्या पुरुषाची प्रतिमा रेखाटली आहे. `सिटी आॅफ ड्राॅअर्स' मध्ये स्त्रीच्या नग्न शरीरातून टेबलाचे खण बाहेर पडताना दाखवले आहेत. `द स्पेक्टर आॅफ सेक्स अपील' या चित्रकृतीकून त्याने बालकांच्या मनातील सुप्त कामप्रेरणांचा प्रतिकात्मक वेध घेतला. `वन सेकंद बिफोर अवेकनिंग फ्राॅम अ ड्रीम काॅज्ड बाय द फ्लाईट अराऊंड अ पाॅमग्रेनेट' (इ.स. १९४४) या चित्रातून त्याने डाळिंबातून झेपावणारी क्रूर श्वापदे स्त्रीवर आक्रमण करताना रेखाटली आहेत. स्पेनमधील यादवी युद्धावर `प्रीमोनिशन आॅफ सिव्हिल वार' हे यादवीचे संहारक परिणाम सूचित करणारे चित्र साल्वादोरने इ.स. १९३६ साली काढले. फ्राॅइडच्या `नार्सिसिझम'वर आधारलेले `मेटॅमाॅर्फोसिस आॅफ नार्सिसस' हे चित्रही त्याने रेखाटले. अवकाशाची असीमता आणि काळाची अनेकार्थी रुपे सूचित करणारे `द पार्सिस्टन्स आॅफ मेमरी' हे चित्र त्याने इ.स. १९३१ साली रेखाटले.
 
== बाह्य दुवे ==