"एडनचे आखात" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
छोNo edit summary
 
ओळ २:
'''एडनचे आखात''' हे [[अरबी समुद्र]]ाचे एक [[आखात]] आहे. हे आखात उत्तरेकडील [[अरबी द्वीपकल्प]]ावरील [[येमेन]]ला [[आफ्रिकेचे शिंग|आफ्रिकेच्या शिंगामधील]] [[सोमालिया]] देशापासून वेगळे करते. वायव्येला [[बाब-अल-मांदेब]] ही [[सामुद्रधुनी]] ह्या आखाताला [[लाल समुद्र]]ासोबत जोडते. ह्या आखाताचे नाव [[येमेन]]मधील समुद्रकिनाऱ्यावर वसलेल्या [[एडन]] ह्या शहरावरून पडले आहे.
 
[[सुएझ कालवा|सुएझ कालव्यामधून]] [[भूमध्य समुद्र]] व [[अरबी समुद्र]]ादरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय जलवाहतूकमार्गाचा एडनचे आखात हा महत्त्वाचा भाग आहे. येथून दरवर्षी सुमारे २१,००० जहाजे जातात. [[सोमालिया]]मध्ये आश्रय घेतलेल्या [[समुद्री चाचे|सागरी चांचांद्वारे]] अनेक मालवाहू जहाजांचे खंडणीसाठी होणारे अपहरण ह्यासाठी एडनच्या आखातामधील जलमार्ग धोकादायक बनला आहे. सोमालियामध्ये संपूर्ण अराजक असल्यामुळे ह्या चाचांवर कारवाई करणे अशक्य होते. ह्यासाठी अनेक देशांनी आपली लढाऊ जहाजे ह्या भागात तैनात केली आहेत. ह्या आखाताद्वारे [[भारत]] दरवर्षी ६० अब्ज डॉलर किंमतीच्या मालाची निर्यात तर ५० अब्जांची आयात करतो. ह्या दृष्टीने ह्या जलमार्गाचे संरक्षण करण्यासाठी [[भारतीय नौसेना]] येथे कायमस्वरूपी गस्त ठेवते.
 
[[वर्ग:आखाते]]