"केशव नारायण काळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: के. नारायण काळे, पूर्ण नाव -केशव नारायण काळे (जन्म:२४ एप्रिल, इ.स. १९...
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
 
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ५:
के. नारायण काळे यांनी ’अभिजात’ ही चित्रपट कंपनी स्थापन केली आणि ’म्युनिसिपालिटी’ या चित्रपटाची निर्मिती केली. प्रभात चित्रसंस्थेवर के. नारायण काळे यांनी एक लघुपट काढला होता.
 
के. नारायण काळे यांनी आठ चित्रपटांत कामे केली होती. नाट्यकलेच्या आकर्षणातून त्यांनी इ.स.१९३३मध्ये ’नाट्यमन्वंतर’ ही नाट्यसंस्था काढली. त्यांनी ’मुद्रा राक्षसम्‌’ या संस्कृत नाटकाचे ’कौटिल्य’ या नावाचे भाषांतर करून ते त्या संस्थेतर्फे रंगमंचावर आणले. त्यागराज कैलासम्‌ यांच्यायांचे दि पर्पज हे नाटक त्यांनी ’प्रयोजन’ या नावाने रंगभूमीवर आणले.
 
नाट्यमन्वंतर या संस्थेने ’आंधळ्यांची शाळा’ हे नाटक रंगमंचावर सादर केले. परंपरेने आलेलेल संगीत पौराणिक-ऐतिहासिक नाटक नाकारून के. नारायण काळे, [[अनंत काणेकर]], [[पार्श्वनाथ आळतेकर]], [[ग.य. चिटणीस]] आदी नाट्यविचारवंतांनी एकत्र येऊन”आंधळ्यांची शाळा’ची निर्मिती केली. यासाठी के. नारायण काळे यांना त्यांचा परदेशी रंगभूमीचा व्यासंग कामी आला. १ जुलै १९३३ रोजी झालेल्या या नाटकाच्या पहिल्याच प्रयोगात [[केशवराव दाते]], नाटककार वर्तकांच्या पत्नी सौ. पद्मावती वर्तक, म.रा. रानडे, [[पार्श्वनाथ आळतेकर]], पितळे, ल.भ. केळकर, माधवराव प्रभू, नामजोशी, हर्डीकर आणि के. नारायण काळे यांच्या भूमिका होत्या. नाटकाच्या नायिका अठरा वर्षे वयाच्या [[ज्योत्स्ना भोळे]] होत्या. या नाटकाचे त्या काळात शंभराच्या आसपास प्रयोग झाले होते.