"काळा समुद्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
इतर भाषांचे विलिनीकरण (थेट विकिडाटा)
छोNo edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ ५:
|}
[[चित्र:Black Sea map.png|thumb|right|300px|काळ्या समुद्राचा नकाशा (इंग्लिश मजकूर)]]
'''काळा समुद्र''' ([[तुर्कस्तान]]: ''Karadeniz'', ''कारादेनिझ'' ; [[ग्रीक भाषा|ग्रीक]]: ''Μαύρη Θάλασσα'' ; [[रशियन भाषा|रशियन]]: Чёрное море ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Black Sea'', ''ब्लॅक सी'' ;) [[आग्नेय दिशा]] [[युरोप|युरोपातील]] हा भूवेष्टित समुद्र आहे. या समुद्रास युरोप, [[अनातोलिया]] व [[कॉकेशस|कॉकेशसाने]] वेढले असून, [[भूमध्य समुद्र]] [[एजियन समुद्र]] व अनेक [[सामुद्रधुनी|सामुद्रधुन्यांद्वारे]] [[अटलांटिक महासागर|अटलांटिक महासागराशी]] जोडला गेला आहे. तसेच, तो [[बोस्फोरस]] सामुद्रधुनीमार्फत [[मार्माराचा समुद्र|मार्माराच्या समुद्राशी]] जोडला गेला आहे, तर [[डार्डेनेल्झ]]ची सामुद्रधुनी त्याला भूमध्य समुद्राच्या '[[एजियन समुद्र]]' या उपसमुद्राशी जोडते. ही जलराशी पूर्व युरोप व पश्चिम आशिया यांना दुभागते. काळा समुद्र हा कर्चाच्या[[कर्चची सामुद्रधुनी|कर्चच्या सामुद्रधुनीद्वारे]] [अझोवचा समुद्र[अझोवच्या समुद्राशीही]] जोडला गेला आहे. काळ्या समुद्राचे क्षेत्रफळ ४,३६,००० वर्ग कि.मी. (१६८,५०० वर्ग मैल) (अझोवाचा समुद्र वगळता), सर्वाधिक खोली २,२०६ मी. (७,२३८ फूट), आणि आकारमान ५४७,००० घन कि.मी. (१३१,२०० घन मैल) इतके आहे. [[बल्गेरिया]], [[जॉर्जिया]], [[रशिया]], [[रोमेनिया]], [[तुर्कस्तान]] आणि [[युक्रेन]] यांमध्ये तयार होणाऱ्या पूर्व पश्चिमोत्तर लंबवर्तुळाकार भूभागात काळा समुद्र तयार झालेला आहे.
याच्या दक्षिणेस पोंटिक पर्वतरांगा, तर पूर्वेस कॉकॅशस[[कॉकेसस पर्वतरांगापर्वत]]रांगा आहेत.या समुद्राची जलपृष्ठावरील पूर्व पश्चिम दिशेतील सर्वाधिक लांबी (पूर्व-पश्चिम) १,१७५ कि.मी. आहे.
 
[[इस्तंबूल|इस्तंबुल]] हे [[तुर्कस्तान|तुर्कस्तानातील]] सर्वांत मोठे शहर याच समुद्राच्या काठावर वसलेले आहे. [[बातुमी]], [[बुर्गास]], [[कोन्स्टान्ट्सा]], गिरेसुन, होपा, [[इस्तंबूल]], कर्च, [[खेर्सन]], मंगालिया, नावोदारी, नोवोरोस्सिक, [[ओदेसा]], [[ओर्दू]], पोटी, रिझे, सामसुन, [[सेव्हास्तोपोल]], [[सोत्शी]], [[सुखुमी]], [[त्राब्झोन]], [[व्हर्ना]], [[याल्ता]] आणि झोगुल्डाक ही या समुद्राच्या काठाने वसलेली काही महत्त्वाची शहरे आहेत.
ओळ २८:
वरील नावे ही इ.स.च्या बाराव्या शतकापूर्वीची आहेत, असे मानले जाते. काळ्या समुद्राला त्याचे नाव हे [[ओस्मानी साम्राज्य|ओस्मानी तुर्कांकडून]] प्राप्त झालेले आहे. मध्ययुगीन तुर्की भाषेत 'कारा (शब्दश: अर्थ: ''काळा'')' या शब्दाचा एक अर्थ ''उत्तर दिशा'' असाही होता. उदाहरणार्थ, 'कारा-देनित्झी' (कारा समुद्र), हा काळ्या समुद्राप्रमाणेच सायबेरियाई याकुत तुर्कांच्या उत्तरेस असणारा एक समुद्र आहे. त्याचप्रमाणे, तुर्कीत 'लाल' हा 'दक्षिण दिशा' या अर्थानेही वापरतात. उदाहरणार्थ, 'लाल समुद्र' जो अनातोलियाच्या दक्षिणेस आहे. याप्रमाणेच 'अक्'-पांढरा पश्चिमेसाठी. प्राचीन अनातोली तुर्कीत (तुर्की भाषेत) एजियन आणि भूमध्य यांना एकत्र 'अक्देनित्झ'-पांढरा समुद्र, असे संबोधत, तर आधुनिक तुर्की भाषेत फक्त भूमध्य समुद्रालाच अक्देनिझ संबोधतात कारण भूमध्य समुद्राच्या उत्तरेकडील भागाला एजियन समुद्र हे पाश्चात्य नावाला अनुसरून नाव देण्यात आले आहे. ओट्टोमन तुर्कांच्या वेळी असे नव्हते, कारण त्या वेळी ओट्टोमन तुर्क एजियन समुद्राला, त्यातील ग्रीस आणि अनातोलिया यांच्या मध्ये असणाऱ्या १२ बेटांचा निर्देश करीत, 'बेटांचा/द्वीपांचा सागर'-अदलर देनित्झी, असे संबोधित.
 
काळा समुद्र हा चार पैकी एक समुद्र आहे, ज्यांची इंग्रजी नावे ही रंगांवर आधारित आहेत. [[लाल समुद्र]], [[पांढरा समुद्र]] आणि [[पिवळा समुद्र]] हे त्यातील इतर तीन समुद्र होय.
 
=== प्राचीन ===
ओळ ५१:
 
[[वर्ग:समुद्र]]
[[वर्ग:युरोपभूमध्य समुद्र]]
[[वर्ग:विशेष लेख]]