"तरस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
छो 115.242.111.160 (चर्चा) यांनी केलेले बदल EmausBot यांच्या आवृत्तीकडे पूर्वपद...
ओळ ३९:
[[वर्ग:प्राणी]]
[[वर्ग:सस्तन प्राणी]]
 
हा मासभक्षी गणातील हायनीडी कुलातील एक सस्तन प्राणी आहे. हायनिडी कुलात हायना आणि क्रोक्यूटा हे दोन वंश आहेत.
तरसांच्या एकूण तीन जाती आहेत; त्यांपैकी पट्टेवाला तरस नैर्ऋत्य आशियातस
तपकिरी तरस द. आफ्रिकेत ऱ्होडेशिया व मोझँबिकच्या उत्तरेस आणि ठिपकेवाला तरस आफ्रिकेत सहारा वाळवंटाच्या दक्षिणेस आढळतो.
भारतात फक्त पट्टेवाला तरस आढळतो; त्याचे शास्त्रीय नाव हायना हायना असे आहे. त्याची लांबी १५० सेंमी. असते; त्यात शेपूटच ४६ सेंमी. असते; उंची ९० सेंमी. आणि वजन ३०–५४ किग्रॅ. असते.भारतीय तरसाचा रंग भुरकट पिवळा किंवा राखी असून केस भरभरीत असतात. मानेवरचे केस लांब व दाट असल्याने आयाळीसारखे दिसतात; तोंड कुत्र्यासारखे व काळे; कान सदा ताठ उभे; जबडा अतिशय मजबूत; तरसाचा जबडा इतका भक्कम असतो की, वाघ-सिंहांना न फुटणारी हाडे तो सहज फोडतो. मान भरदार; तोंड, पाय व नख्या कुत्र्याप्रमाणे पण दातांची ठेवण मार्जार कुलातील प्राण्यांप्रमाणे; छाती रुंद, पाठीचा मागचा भाग अरुंद व उतरत गेल्यामुळे तरसाला कुबड आल्यासारखे दिसते. पुढचे पाय मागच्या पायांपेक्षा मजबूत व लांब; मागचे पाय आखूड आणि कमकुवत असून पळताना गुडघे एकमेकांवर घासतात व मागचे पाय फरफटत नेल्यासारखे वाटतात. तरस नेहमी चवड्यावर चालतो, नख्या आखूड व बोथट असून मांजराप्रमाणे आत ओढून घेता येत नाहीत. तरसाच्या शेपटाखाली गंध ग्रंथी असून तीतून तो एक प्रकारचा स्राव फवारतो.
 
ओढ्याजवळच्या किंवा डोंगरकपारीच्या घळीत किंवा मोठ्या खडकाच्या आड, स्वतः किंवा सायाळीने केलेल्या बिळात तरस घर करून राहतो. तो निशाचर असून एकटा किंवा जोडीने शिकार करतो. मेलेले व कुजलेले प्राणी हे याचे मुख्य खाद्य आहे. हा आजारी व दुबळे प्राणी मारून खातो. कुजके मांस पुरेसे मिळाले नाही, तर हा शेळ्या, मेंढ्या व कुत्री मारून खातो. कुजके मांस खाण्याच्या याच्या सवयीमुळे याला जंगलाचा आरोग्यरक्षक म्हटले आहे. काही तरस फिसकारतात, तर काहींचा आवाज माणसाच्या हसण्याप्रमाणे असतो.
मादीला उन्हाळ्यात सामान्यतः २–४ पिल्ले होतात. पिल्लांच्या अंगावर स्पष्ट काळे पट्टे असतात. प्रौढ प्राण्यात हे पट्टे काहीसे अस्पष्ट होतात.
तपकिरी तरसाचे शास्त्रीय नाव हायना ब्रूनिया आणि ठिपकेदार तरसाचे क्रोक्यूटा क्रोक्यूटा आहे. आफ्रिकेतील तरस नेहमी कळपाने शिकार करतात आणि बैलासारख्या मोठ्या प्राण्यावर देखील हल्ला करतात. सिंह आणि वाघ यांच्यासारखे प्राणी म्हातारे होताच तरसांचा कळप त्यांना जिवंतणीच फाडून खातो. निसर्गाने तरसांना विलक्षण बुद्धी दिली आहे
"https://mr.wikipedia.org/wiki/तरस" पासून हुडकले