"विंचू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ८:
== आढळ ==
विंचवांचा आढळ कौले, घाराची छते, जुने कपडे, काढून ठेवलेल्या चपला, बूट, अडगळ अशा ठिकाणी असतो. छतातून रात्री विंचू खाली पडतात. अंधारात स्वसंरक्षणाच्या प्रयत्नात दंश करतात. यासाठी कौलारु छत असेल तर त्याखाली लाकडाचे अजून एक स्तराचे छत असणे महत्त्वाचे असते. शेती मध्ये काम करताना हातात जाड हात मोजे वापरणे योग्य असते. अंथरुणे गुंडाळून ठेवलेली पांघरुण झटकून मगच झोपावे.
 
== विषबाधेचे स्वरूप ==
विंचवाच्या विषातील रासायनिक तत्त्वाने एका विशिष्ट प्रकारचे [[मज्जातंतू]] उद्दीपित होतात व होतच जातात. त्या उद्दीपनाच्या अतिरेकाचा दुष्परिणाम होतो. या प्रकारच्या "ऑटोनोमिक" मज्जातंतूंच्या अतिरेकामुळे मुळे काय दुष्परिणाम होऊ शकतात ते दंशातून शरिरात किती [[विष]] गेले आहे त्यावर अवलंबून आहे. कमी प्रमाणात टोचले गेले असले, तर दंशाच्या ठिकाणी दुखते, वाढत्या प्रमाणात दंशापासून दूर दूर परिणाम होतो. अर्थात विषाचा प्रभाव आपोआप उतरताना दुरून जवळपर्यंत दुखणे नाहिसे होते. त्याहून जास्त प्रमाणात विष टोचले जाता शरीरभर "ऑटोनोमिक" मज्जातंतूंचे अतिरेकी उद्दीपन होते. याला "ऑटोनोमिक वादळ" म्हणतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/विंचू" पासून हुडकले