"राष्ट्रीय स्वयंसेवक संघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
छो मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
ओळ ५२:
 
=== शाखा ===
 
[[Image:Sangh karyakram.JPG|thumb|200px|सरसंघचालक प्रणाम कार्यक्रम, जबलपुर]]
वर नमूद केल्याप्रमाणे शाखा ही संघाच्या रचनेतील महत्त्वाचे अंग आहे. शाखा मोकळ्या पटांगणांवर, शाळेच्या मैदानांवर, मंदिरांबाहेरील मोकळ्या जागेत वा वस्तीतील मोकळ्या जागेत भरतात. सकाळी भरणाऱ्या शाखेस प्रभातशाखा तर सायंकाळी भरणाऱ्या शाखेस सायंशाखा असे म्हणतात. प्रभात शाखेत मुख्यत्वे प्रौढ लोकांचा भरणा जास्त असतो, तर सायंशाखेत लहान मुले, बाल व तरुण असतात. शाखेची नियमित वेळ १ तासाची असते. सायंशाखेची वेळ बहुतकरून ५ ते ६, ६ ते ७ किंवा ६.३० ते ७.३० अशी असते. प्रत्येक भागातील शाळांच्या वेळा विचारात घेऊन सोईची वेळ ठेवतात. शाखेची सुरुवात भगवा ध्वज उभारून त्याला प्रणाम करून होते. या नंतर विविध प्रकारचे मैदानी खेळ खेळले जातात. याचबरोबर दंड आणि प्राचीन भारतीय युद्ध कला म्हणजेच नियुद्ध यांचे प्राथमिक शिक्षण दिले जाते. शाखेत योगासने योग, कसरतीचे खेळ वगैरे असतातच पण याशिवाय, ज्यात विविध सामाजिक विषयांची माहिती देऊन चर्चा करता येईल अशी बौद्धिके असतात. शैक्षणिक बौद्धिकांमध्ये बहुधा भारताचा इतिहास, भारतीय तत्त्वज्ञान, भारतीय संस्कृती तसेच चालू घडामोडी इत्यादि विषय हाताळले जातात. यानंतर पद्य म्हणले जाते. शेवटी भारतमातेची प्रार्थना म्हणून ध्वज उतरवला जातो व त्या दिवसाच्या शाखेच्या बैठकीची सांगता होते.