"संगणकीय विषाणू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
'''संगणकीय विषाणू''' (अन्य नावे: '''संगणक विषाणू''' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Computer virus'' ( ''काँप्युटर व्हायरस'')) ही संगणकामध्ये घुसून [[संगणक|संगणकाच्या]] सॉफ्टवेरला हानिकारक संसर्ग पोचवू शकणारी संगणकीय प्रणाली असते. बऱ्याचदा संगणकीय विषाणू ही संज्ञा ''अ‍ॅडवेअर'', ''स्पायवेअर'' या प्रकारांतल्या संगणकात बिघाड न करणाऱ्या प्रणालींसकट सर्वच [[मालवेअर|दुष्ट प्रणालींसाठी]] ढोबळपणे वापरली जाते. मात्र अचूकपणे बोलायचे झाल्यास एखाद्या एक्झिक्यूटेबल प्रोग्रामाच्या रूपाने जालावरून अथवा [[काँपॅक्ट डिस्क]], [[फ्लॉपी डिस्क]], [[डीव्हीडी]] अथवा यूएसबी ड्राइव्ह इत्यादी साठवणुकीच्या माध्यमांमार्फत एका संगणकापासून दुसऱ्या संगणकाला बाधा पोहोचवू शकणारी प्रणाली संगणकीय विषाणू मानली जायला पाहिजे.
संगणकावर सुरक्षेसाठी संगणकी़य विषाणू प्रतिबंधक(अँटि व्हायरस) [[स्पायवेअर]] व [[फायरवॉल]] असलीच पाहिजे