"लंडन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२८ बाइट्स वगळले ,  ६ वर्षांपूर्वी
छो
== खेळ ==
[[चित्र:Lord's Pavillion.jpg|left|thumb|[[लॉर्ड्स मैदान, लंडन|लॉर्ड्स क्रिकेट मैदान]]]]
लंडनने आजवर [[१९०८ उन्हाळी ऑलिंपिक|१९०८]], [[१९४८ उन्हाळी ऑलिंपिक|१९४८]] व [[२०१२ उन्हाळी ऑलिंपिक|२०१२]] ह्या तीन वेळा [[ऑलिंपिक]] खेळांचे आयोजन केले आहे. तीन वेळा ऑलिंपिक यजमानपदाचा बहुमान मिळवणारे लंडन हे जगातील एकमेव शहर आहे. २०१२ सालच्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी येथे [[ऑलिंपिक मैदान (लंडन)|नवीन ऑलिंपिक मैदान]] बांधले गेले. [[फुटबॉल]] हा लंडनमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. लंडन परिसरात १४ व्यावसायिक फुटबॉल क्लब आहेत ज्यांपैकी [[आर्सेनल एफ.सी.|आर्सेनल]], [[चेल्सी एफ.सी.|चेल्सी]], [[फुलहॅम एफ.सी.|फुलहॅम]], [[क्वीन्स पार्क रेंजर्स एफ.सी.|क्वीन्स पार्क रेंजर्स]] व [[टॉटेनहॅम हॉटस्पर एफ.सी.|टॉटेनहॅम हॉटस्पर]] हे पाच क्लब [[इंग्लिश प्रीमियर लीग]]चे सदस्य आहेत. १९२४ सालापासून [[इंग्लंड राष्ट्रीय फुटबॉल संघ]]ाचे स्थान [[वेंब्ली मैदान (१९२३)|जुने वेंब्ली मैदान]] येथे राहिले आहे. २००७ साली हे स्टेडियम पाडून त्याच ठिकाणी ९०,००० प्रेक्षकक्षमता असलेले नवे [[वेंब्ली स्टेडियम]] उभारण्यात आले.
 
[[रग्बी]], [[क्रिकेट]] व [[टेनिस]] हे येथील इतर लोकप्रिय खेळ आहेत. [[लॉर्ड्स मैदान, लंडन|लॉर्ड्स]] व [[ओव्हल मैदान, लंडन|ओव्हल]] ही क्रिकेट जगतातील दोन ऐतिहासिक व प्रतिष्ठेची मैदाने लंडन शहरातच स्थित आहेत. चार [[ग्रँड स्लॅम (टेनिस)|ग्रँड स्लॅम]]मधील सर्वात मानाची मानली जाणारी [[विंबल्डन टेनिस स्पर्धा]] दरवर्षी जून-जुलै दरम्यान लंडनच्या [[विंबल्डन]] ह्या उपनगरात खेळवली जाते.
२८,६५२

संपादने