"चंदगडी बोलीभाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{हा लेख|'चंदगडी' नामक मराठीची एक बोलीभाषा|वऱ्हाडी}} <big>...
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
(काही फरक नाही)

१५:५५, २१ जुलै २०१३ ची आवृत्ती

चंदगडी: जगातील बहुतेक प्रमुख भाषांप्रमाणेच, मराठी भाषाही एकाहून अधिक पद्धतींनी बोलली जाते. मुख्य भाषेशी नाते कायम ठेवलेली, तिची बोलीभाषा दर १२ कोसांगणिक उच्चारांत, शब्दसंग्रहांत, आघातांत व वाक्प्रचारांत बदलत रहाते. असे असले तरी लिखित भाषेत फारसा फरक नसतो.

चंदगड हा महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील कोल्हापूर जिल्ह्यातील एक डोंगराळ तालुका आहे. हा तालुका कर्नाटकातील बेळगावच्या पश्चिमेला १५ कि.मी. अंतरावर आहे. पूर्वेला कर्नाटक राज्य, पश्चिमेला सिंधुदुर्ग जिल्हा, दक्षिणेला गोवा राज्य असे या परिसराचे भौगोलिक स्थान आहे. या परिसरामध्ये ही चंदगडी बोली बोलली जाते. या बोलीवर कोकणी व कन्नड या दोन भाषांचा प्रभाव आहे. चंदगड परिसरातील विस्तृत भूमीवर या बोलीची दोन रूपे दिसून येतात. या परिसराच्या पश्चिम विभागातील बोलीरुपावर कन्नडचा प्रभाव आहे तर पूर्वेकडील बोलीरुपावर कोकणीचा प्रभाव आहे.
या बोलीभाषेत व्हता, आल्ली, काडूलावत, जातलं, यल्ली, गेल्ली अशी क्रियापदाची रूपे दिसतात. विभक्तीच्या द्वितीयेच्या प्रत्ययांच्या स, ला, ते या प्रत्ययांमध्ये स, ला ऐवजी 'स' हा प्रत्यय सर्वाधिक वापरला जातो. ही बोली उच्चारणदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण असून विशिष्ट हेल काढून बोलणे हे या बोलीचे वैशिष्ट्य आहे.