"वेदना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ २०:
वेदनेचा हा थोडा चमत्कारिक प्रकार आहे. शरीराचा एखादा अवयव अपघाताने किंवा शस्त्रक्रियेने काढून टाकल्यानंतर काढलेल्या भागामधून मेंदूकडे संवेद जात नाहीत. पण अशा व्यक्तीमध्ये काढलेल्या अवयवामध्ये वेदना होत असल्याचे जाणवते. अशा वेदनाना अदृश्य (फॅंटम पेन्स) म्हणतात. धडाच्या वरील भागातील अवयव जसे हात किंवा हाताची बोटे काढलेल्या 82% रुग्णामध्ये अदृश्य वेदनेची लक्षणे दिसतात. धडाच्या खालील भागातील अवयव उदा पाय काढलेल्या रुग्णामध्ये हेच प्रमाण 54% आहे. एका अभ्यासात अवयव गमावल्यानंतर आठदिवसानी 72% रुग्णाना अदृश्य वेदना जाणवायला लागल्या. सहा महिन्यानंतर 65% रुग्णानी आपल्या सर्जनकडे काढलेल्या अवयवामध्ये वेदना होत असल्याचे सांगितले. काहीं रुग्णामध्ये या वेदनांची तीव्रता कमी अधिक पण सतत होत असल्याची तक्रार केली. काहीं रुग्ण दिवसातून कमी अधिक वेळा किंवा आठवड्यातून एक दोन वेळेस अदृश्य वेदना होत असल्याचे सांगितले. या वेदनेचे वर्णन चिरडल्यासारखे, दाह, चाबूक लागल्यासारखे किंवा आकडी येत असल्याप्रमाणे केले. अशा वेदना बराच काळ होत राहिल्यास शरीरचा शाबूत भाग किंवा सामान्य अवयवाला स्पर्श केल्यानंतर अदृश्य वेदना परत चालू होतात असे दिसून आले आहे. कधीकधी या वेदनेबरोबर मूत्र किंवा शौच विसर्जन होते.
 
'' मानसिक वेदना :'' मानसिक, भावनिक किंवा वर्तन यामुळे मानसिक वेदनाना प्रारंभ होतो. अशा वेदना मानसिक त्रास वाढल्यास वाढतात किंवा बरेच दिवस होत राहतात. डोकेदुखी, पाठदुखी आणि पोटदुखी ही मानसिक वेदनेचे कारण असू शकतात. उदाहर्णार्थ परीक्षेच्या ताणामुळे विद्यार्थ्याना हमखास पोटदुखी सुरू होऊ शकते. नको त्या व्यक्ती समोर आल्यास डोकेदुखी सुरू झाल्याची तक्रार येते. वैद्यकीय शास्त्राप्रमाणे अशा वेदना ख-या नाहीत हे ठावूक असले तरी त्यावर मानसिक उपचार करून त्या दूर करता येतात. उन्माद, मानसिक दुर्बलता सारख्या विकारामध्ये वेदनांचे कारण मानसिक असते.
 
''पुन:पुन्हा होणा-या वेदना:''
या वेदना थोडा वेळ पण पुन:पुन: होत राहतात. बहुतांशी या कर्करोगामध्ये आढळून येतात. योग्य ती औषधे घेतल्यानंतर त्या कमी होतात पण पूर्णपणे थांबत नाहीत. रुग्ण आणि कर्करोगाचा अवयव याप्रमाणे याची तीव्रता बदलते.
वेदना संवेद: वेदनेचा संबंध अक्षतंतूंच्या उत्तेजित होण्याशी आहे. मज्जारज्जू कडे वेदना संवेद ए-डेल्टा आणि सी अक्षतंतूमार्फत वाहून नेला जातो. त्वचा, केसांची मुळे, बोटे, अशा परिघवर्ती भागापर्यंत संवेदी अक्षतंतू आलेले असतात. अक्षतंतूंची टोके उष्णता, अपघात, थंडी, आघात, वजन अशा कारणामुळे उत्तेजित झाल्यास वेदना संवेद मज्जारज्जूकडे पाठवले जातात. एडेल्टा प्रकारच्या अक्षतंतूवर असलेल्या मायलिन आवरणामुळे असे संवेद 5-30 मीटर दर सेकंदास एवढ्या वेगाने मध्यवर्ती चेतसंस्थेकडे वाहून नेले जातात. वेगाने वाहून नेलेल्या वेदना संवेदामुळे अवयवाना व पर्यायाने शरीरास इजा होणे टळते. त्या मानाने सी अक्षतंतू कमी व्यासाचे व 0.5- 2 मी प्रतिसेकंद वेगाने संवेद वाहून नेतात. ए अक्षतंतूनी वाहून नेलेले वेदना संवेद तीव्र असून त्यांची जाणीव चटकन होते. अवयव बधिर होणे किंवा त्वचेची आघातानंतर आग होणे अशा वेदना सी अक्षतंतूमार्फत वाहून नेल्या जातात.
वेदना सहन करणे :
प्रत्येक व्यक्तीची वेदना सहन करण्याची शक्ती वेगळी असते. पुरुष वेदना सहन करतात पण स्त्रियाना वेदना सहजासहजी सहन होत नाहीत. पुरुषांची त्वचा जाड असते त्यामुळे अक्षतंतूंची टोके लवकर उद्दीपित होत नाहीत. अत्यंत लहान अर्भकाना वेदना होतात पण त्याना वेदना होतात हे सांगता येत नाही.
सर्व वेदना संवेद मध्यवर्ती चेता संस्थेकडे वाहून नेले जात असले तरी प्रत्यक्ष मेंदूमध्ये वेदना वाहून नेण्यासाठी काहींही यंत्रणा नाही. मेंदूचे कितीही मोठी शस्त्रक्रिया साध्या भुलीखाली केल्या जातात. माशामध्ये वेदना वाहून नेणारे सी अक्षतंतू नसतात.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/वेदना" पासून हुडकले