"चेतासंस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

९ बाइट्स वगळले ,  ८ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (सांगकाम्या: 74 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q9404)
 
चेताजोडण्या आणि चेतासंस्था
चेता संस्थेचे मूळ कार्य चेतापेशीकडे आवश्यक संवेद पाठविणे आणि परस्पर संबंध प्रस्थापित करणे. चेतापेशींच्या परस्पर संबंधामुळे चेतापेशी अनेक विस्तृत कामे करू शकतात. त्यामध्ये अभिज्ञान (डिटेक्शन) ,आकृतिबंध बनविणे ( पॅटर्न जनरेशन) , आणि काळाचे भान अशाचा समावेश होतो. चेतापेशींच्या नेमक्या कामाचा आढावा ही मोठी कठीण बाब आहे. कारण अनेक पेशी एकाच वेळी अनेक कार्याशी संबंधित असतात. आजच्या प्रगत संशोधनाने सुद्धा परस्पर संबंधी चेता पेशी काय करीत असतात याची पुसटशी कल्पना गणिताच्या सहाय्याने करण्यात अपयश आले आहे.
शास्त्राच्या इतिहासात चेतासंस्थेचे प्रमुख कार्य संवेद आणि प्रतिसाद देणारी यंत्रणा असे आहे. या अनुषंगाने संवेदी चेता पेशीमध्ये संवेदापासून पेशीचे कार्य सुरू होते. साखळी पद्धतीने संवेद एकापाठोपाठ दुसऱ्या चेतापेशीकडून मेंदूकडे पाठविले जाते. मेंदूकडून आज्ञापेशीकडे पाठविलेला आवेग स्नायूकडे आल्यानंतर प्रतिक्रिया पूर्ण होते. देकार्त या शात्रज्ञास प्राण्यांचे आणि मानवी वर्तन संवेद प्रतिसाद यंत्रणेने स्पष्ट होईल असे वाटत होते. पण उच्च बोधीय (कॉग्निटिव्ह) वर्तनाचे उदाहरणार्थ भाषेचा वापर, प्रेरणा, अमूर्त कल्पना यांचे स्पष्टीकरण केवळ संवेद प्रतिसाद या पद्धतीने देता येईल असे त्यास वाटत नव्हते. 1906 साली चार्लस शेरिंग्टन याने लिहिलेल्या “इंटिग्रेटेड अॅतक्शन ऑफ नर्व्हस सिस्टीम” या पुस्तकामध्ये संवेद प्रतिसाद यंत्रणेवर विस्तृत विवेचन केलेले आहे. विसाव्या शतकात मानसशास्त्रज्ञानी वर्तन हे चेतासंस्थेचे प्रमुख कार्य मानल्याने संवेद प्रतिसाद प्रक्रियेने मानवी वर्तनाचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला गेला.
विद्युत शरीररचना शास्त्र, या नव्या शाखेच्या विसाव्या शतकातील अभ्यासानंतर 1940 मध्ये चेतासंस्थेमध्ये उपजत संरचना (पॅटर्न) बनविण्याची यंत्रणा असते. या संरचना बनविण्यासाठी बाह्य संवेदाची गरज नसते असे समजले. चेतापेशी ठरावीक वेळाने संवेद किंवा संवेद समूह आपोआप पाठवितात हे कळले. चेतापेशी पूर्णपणे वेगळी केली तरी हे चालूच राहते. चेतापेशी परस्पराशी जोडल्या गेल्यानंतर ही यंत्रणा अधिकच गुंतागुंतीची कामे करू लागते. सध्याच्या आधुनिक सिध्द्धांताप्रमाणे चेतासंस्थेचे कार्य संवेद प्रतिसाद साखळ्या आणि उपजत आवेग संरचनेच्या तयार होण्याने नियंत्रित होतात आणि प्राण्याचे वर्तन याच्या समुच्चयाने होते असे सिद्धझाले आहे.
 
== प्रतिक्षेपी क्रिया ==
१५५

संपादने