"कल्याण स्वामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
No edit summary
ओळ ८:
==समर्थ रामदास स्वामी आणि कल्याण स्वामी==
[[File:Ramdaskalyan.jpg|thumb|अंबाजीने फांदी तोडली ]]
सन १६४८ ते सन १६७८पर्यंत कल्याणस्वामी हे समर्थ रामदास स्वामी यांच्या बरोबर होते. रामदास स्वामींनी कल्याण स्वामींच्या शिष्यत्वाच्या अनेक परीक्षा घेतल्या. त्या सर्व परीक्षांमध्ये ते पूर्णपणे उत्तीर्ण झाले. रामनवमीच्या रथयात्रेत रामाचा रथ आडव्या आलेल्या एका झाडाच्या फांदीमुळे अडला. तेव्हा रामदासांनी ती फांदी तोडण्याची आज्ञा केली. परंतु ती फांदी जो तोडेल तो तिच्या खाली असलेल्या खोल विहिरीत पडेल, अशी परिस्थिती होती. तेव्हा क्षणाचाही विलंब न करता अंबाजीने ती फांदी तोडली व ते विहिरीत पडले, आणि रथ पुढे गेला. संध्याकाळी सर्व शिष्यांना अंबाजीची आठवण झाली. इतक्या वेळ पाण्यात राहिल्याने अंबाजी मृत झाले की काय अशी भीती सर्व शिष्यांना होती. ते समर्थांना घेऊन त्या विहिरीजवळ आले. समर्थांनी अंबाजीला विचारले 'अंबाजी, कल्याण आहे ना ?' तेव्हा आत पाण्यातून उत्तर आले 'स्वामी, आपल्या कृपेने कल्याण आहे'. तेव्हापासून अंबाजी हे कल्याण स्वामी म्हणून ओळखले जाऊ लागले. ही घटना मसूर येथे घडली.
[[File:'कल्याणा, छाटी उडाली'..jpg|thumb|'कल्याणा, छाटी उडाली'.]]
एकदा, सज्जनगडावर गडाच्या टोकाशी रामदास उभे राहिले असताना, त्यांची छाटी(वस्त्र) वाऱ्याने उडाली. तेव्हा समर्थ उच्चारले 'कल्याणा, छाटी उडाली'. हे ऐकताच गुरुभक्त कल्याण स्वामींनी कड्यावरून खाली उडी घेतली व ती छाटी हवेतच झेलली. ती जागा आजही सज्जनगडावर कल्याण छाटी या नावाने दाखवतात.
 
[[File:Kalyan swami.jpg|thumb|समर्थांनी चोरांचे हृदयपरिवर्तन केले ]]