"वेदना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 64 langlinks, now provided by Wikidata on d:Q81938
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Injured Bystrov.JPG|thumb|right|250px|दुखापतीमुळे वेदनाग्रस्त होऊन मैदानावर पडलेला खेळाडू]]
'''वेदना''' (अन्य मराठी नावे: '''कळ''') म्हणजे एखाद्या हानिकारक किंवा तीव्र कारकामुळे उद्भवणारी ''दुःखदायक'' [[जाणीव]] होय.
वेदना हे न सहन होणारी संवेदना बहुतेक वेळा तीव्र किंवा हानिकारक उद्दीपनामुळे झालेली असते. उदाहरणार्थ ठेच लागणे, भाजणे, जखमेवर अल्कोहोलचा स्पर्श . आंतरराष्ट्रीय वेदना अभ्यास संघटनेच्या व्याख्येप्रमाणे “ प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष उतींच्या हानीबरोबर संबंधित असुखकारक आठवण म्हणजे वेदना.” वेदनेचे वर्णन करताना ते किती सहन होते किंवा सहन होत नाही अशा प्रकारे केले जाते.
कोणत्याही प्रकारच्या शरीराच्या प्रत्यक्ष इजा किंवा इजेच्या कारणापासून वेदना शरीराचे रक्षण करते. भविष्यात अशा प्रसंगी होणारी हानि टाळता येते. वेदनेचे कारण दूर झाले म्हणजे वेदनेची तीव्रता कमी होते. शरीराला झालेली हानी बरी झाली म्हणजे वेदना होत नाहीत. क्वचित कोणत्याही प्रकारचे इजा होण्याचे किंवा रोगाचे दृश्य कारण नसताना सुद्धा वेदना होतात.
वेदना होतात म्हणून वैद्यकीय सल्ल्यासाठी जाणा-या रुग्णांचे प्रमाण मोठे आहे.पोटात दुखत आहे, डोके दुखत आहे, पाय दुखताहेत अशा कारणासाठी रुग्ण डॉक्टरकडे येतात. वेदनेमुळे रुग्ण अस्वस्थ होतो, नेहमीच्या कामात त्याचे लक्ष लागत नाही. समूहाबरोबर असणे, स्वयंसूचना, उत्तेजना, लक्ष दुसरीकडे जाणे, ताण अशा कारणामुळे वेदनेची तीव्रता बदलू शकते.
 
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/वेदना" पासून हुडकले