"दूध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 147 langlinks, now provided by Wikidata on d:Q8495
खूणपताका: संदर्भा विना भला मोठा मजकुर ! कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा.
ओळ ७:
 
नवजात अर्भकासाठी दूध हे पोषक [[अन्न]] आहे, सुरुवातीच्या दुधात रोग प्रतिकारक पदार्थही असतात.
 
 
सस्तन प्राण्यांच्या नवजातांच्या पोषणासाठी मातेच्या स्तनातून नवजातांच्या जन्मानंतर स्त्रवणारा द्रव पदार्थ म्हणजे दूध. फक्त सस्तन प्राणी आपल्या पिलाना स्तनांमधून दूघ पाजून मोठे करतात. सस्तन प्राण्यामध्ये घर्मग्रंथींचे रूपांतर दुग्धग्रंथीमध्ये होते. दूध हे पाणी, मेदाम्ले, प्रामुख़्याने केसीन (प्रथिन) , आणि लॅक्टोजचे (शर्करा) कलिली मिश्रण आहे. याशिवाय सोडियम,पोटॅशियम, कॅलशियम चे क्षार, आणि सूक्ष्म प्रमाणात फॉस्फरस पेंटाऑक्साइड, अ आणि ड जीवनसत्व असते. दुधामध्ये काहीं प्रमाणात जिवाणूप्रतिबंधक आणि कवकप्रतिबंधक विकरे असतात. सस्तन प्राण्यांच्या सर्वच जातीमध्ये दूध निर्मिती होते. सस्तन प्राण्यामधील दूध निर्मितीसाठी आवश्यक ‘कप्पा जीन’चा केसीन निर्मितीमध्ये महत्वाचा सहभाग आहे. हे जनुक नसल्यास सस्तन प्राण्यामध्ये दूधनिर्मिती होत नाही. या जनुकाचा शोध हैद्राबाद मधील सेंटर फॉर सेल अॅंधड मोलेक्युलर बायॉलॉजी या संस्थेमध्ये लागला आहे. स्तनी वर्गातील दूधनिर्मितीची जनुके एकसारखी असली तरी सर्व स्तनी वर्गामधील दुधामधील घटक आणि प्रतिकारद्रव्ये जातिनुसार भिन्न असतात.
दुधातील प्रथिनांच्या प्रमाणावर पिलाची वाढ किती वेगाने होणार हे अवलंबून असते. उदाहरणार्थ घोड्याच्या शिंगराचे वजन दुप्पट व्हायला साठ दिवस लागतात तर हार्प सीलचे पिलू पाच दिवसात दुप्पट वजनाचे होते. प्रतिलिटर मानवी दुधात 15 ग्रॅम प्रथिने असतात तर रेनडियरच्या दुधातील प्रथिनांचे प्रमाण 109 ग्रॅम असते.
मादीने पिलास जन्म दिल्यानंतर पहिल्या काहीं दिवसात स्तनातून येणा-या दुधास कोलोस्ट्रम म्ह्णतात. कोलोस्ट्रममधील प्रतिकारद्रव्ये संसर्गापासून पिलांचे संरक्षण करतात. पशुपालन चालू झाल्यानंतर मानवाने इतर जनावरांच्या दुधाचा अन्नात समावेश केला आहे. गाय,बकरी,उंट,म्हैस, याक, गाढवीण यांचे दूध उपलब्धतेप्रमाणे वापरले जाते. अधिक उपलब्ध झालेले दूध टिकवून ठेवण्यासाठी दूध विरजून त्याचे दही आणि चीझ बनवण्याची पद्धत सु. दोन हजार वर्षापूर्वीची आहे.
स्तनामध्ये तयार झालेले दूध स्तनपान केल्याशिवाय पिलाना मिळत नाही. त्यासाठी स्तनाग्रे चोखण्याची क्रिया करावी लागते. पिलानी स्तनाग्रे चोखण्यास प्रारंभ केल्यास पश्च पोषग्रंथीमधून ऑक्सिटॉसिन नावाचे संप्रेरक स्त्रवते. ऑक्सिटॉसिनच्या प्रभावाने स्तनामध्ये साठलेले दूध आचळातून बाहेर वाहते. (पहा दुग्धस्रवण). आता दुग्धव्यवसाय पूर्ण व्यावसायिक पद्धतीने केला जातो. भारतामधील पशूंची संख्या जगात पहिल्या क्रमांकाची आहे. त्यामुळे भारतात सर्वाधिक दूध उत्पादन होते. यास धवल क्रांती या नावाने ओळखले जाते. दुभत्या जनावरांची संख्या भारतात सर्वाधिक असली तरी प्रत्येक दुभत्या जनावरामागे सर्वाधिक दूध उत्पादन हॉलंडमध्ये होते.
दुधामधील केसीनरेणूबरोबर कॅल्शियम फॉस्पेटचे रेणू बद्ध असल्याने केसीनच्या अन्ननलिकेतील पचनाबरोबर कॅल्शियम फॉस्पेटचेसुद्धा शोषण होते. त्यामुळे सस्तन प्राण्यांची हाडे अधिक बळकट बनतात. त्यामुळे दूध हा आपल्या आहारातील महत्वाचा कॅल्शियमचा स्त्रोत बनला आहे. याबरोबर दुधामधील प्रथिने आणि मेदाम्लामुळे लहान मुलांचे पोषण होते. लॅक्टोज या दुधातील शर्करेचे काहीं बालकामध्ये विकराच्या अभावामुळे पचन होत नाही. अशा बालकाना दुधाऐवजी सोयाबीनपासून बनवलेले ‘दूध’ दिले जाते. दूध हे पूर्ण अन्न आहे ही समजूत पूर्णपणे खरी नाही. दुधामध्ये लोह नसते. त्यामुळे केवळ दुधावर अवलंबून असलेल्या बालकामध्ये लोहाची कमतरता आढळते.
 
== माणसांच्या आहारातील दूधाचे स्थान ==
 
 
जगभरामधे दूध व दूग्धजन्य पदार्थांचा वापर एक अन्नपदार्थे म्हणून केला जातो. मनुष्यप्राणी फार पूर्वीपासून दूधाचे सेवन करत आला आहे. त्यासाठी खास दूध देणारे [[प्राणी]] पाळण्यात येतात. दुग्धोत्पादनासाठी प्रामुख्याने गायी पाळण्यात येतात. त्या खालोखाल [[शेळी]], [[मेंढी]], [[म्हैस]] या प्राण्यापासून दूध मिळवले जाते. दुग्धोत्पादनासाठी भौगोलिकतेप्रमाणे उपलब्ध [[प्राणी]] जसे [[उंट]], [[याक]], [[मूस]] आदींचाही वापर केला जातो. कमी अधिक प्रमाणात [[घोडा]], [[गाढव]], [[रेनडियर]], [[झेब्रा]] या प्राण्यांपासून दुग्धोत्पादन होते. दूधापासून [[दही]], [[लोणी]], [[चीज]], [[साय|क्रिम]], [[दही|योगर्ट]], [[आईसक्रीम]] आदी अनेक पदार्थे तयार केले जातात ज्यांचा आहारात मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/दूध" पासून हुडकले