"चालुक्य शिल्पस्थापत्य शैली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 2 langlinks, now provided by Wikidata on d:Q4303378
छो आंतरविकी दुवे काढले, विकिडेटावरून थेट दुवे असतील, replaced: पध्दत → पद्धत (2)
ओळ १:
'''चालुक्य शिल्पस्थापत्य शैली''' ही [[इ.स.चे ६ वे शतक|इ.स.च्या ६ व्या]] व [[इ.स.चे १२ वे शतक|इ.स.च्या १२ व्या शतकांदरम्यान]] अस्तित्वात असलेल्या [[चालुक्य साम्राज्य|चालुक्य साम्राज्यात]] प्रचलित असलेली [[स्थापत्य|स्थापत्यशैली]] होती.
 
चालुक्य शिल्पस्थापत्य शैलीची देवालये उंच जोत्याची असतात. ९ ते १० फूट जोते ठेणयाचा प्रघातही या पध्दतीतपद्धतीत होता. ही देवालये सामान्यपणे चौथर्यावर उभारली जातात. देवालयाची स्थापत्य रचना तारकाकृती किंवा अष्टभद्र आराखड्यावर असधारीत असते. देवालयाचा छज्जा सरळ, जाड आणि रुंद ठेवण्याची पध्दतीपद्धती असते. चालुक्य शिल्पस्थापत्य कलापरंपरेत अनेक वैशिष्ट्ये आढळतात. या प्रकारच्या देवालयातील द्वारपट्टीका विशेषरीत्या अलंकारीक असतात. कलशपात्राची शिल्परचना तिथे असते. उंबरठ्यावर किर्तीमुख असते. देवालयातील शिल्परचनेत [[अष्टदिक्पाल]], [[सप्तमातृका]] शिल्प आदिंचा समावेश असतो. समचतुष्कोनाकृती भौमितीक आकृत्यादेखील अनेक देवळातून आढळतात.<ref>{{स्रोत पुस्तक | लेखक = पर्सी ब्राउन | शीर्षक = इंडियन आर्किटेक्चर (बुद्धिस्ट अँड हिंदू) | प्रकाशक = डी.बी. तारापोरवाला सन अँड कं. | वर्ष = इ.स. १९९९ | भाषा = इंग्लिश}}</ref> उत्तर चालुक्य कलेचे टप्पे [[नांदेड]], [[लातूर]], [[उस्मानाबाद]] या दक्षिण [[मराठवाडा|मराठवाड्यातील]] जिल्ह्यांमध्ये दिसून येतात. या भागातील मंदिरे स्थापत्यदृष्ट्या उत्तर कर्नाटकातील मंदिरांशी मिळतीजुळती आहेत. त्यातील आकृतीशिल्पे स्तंभांच्या खांबांवर आणि मंडोवरावर असतात. महाकाय प्रतिहारमूर्ती गर्भगृहाच्या द्वाराच्या दुतर्फा आणि मूर्तीशिल्पे मंडपाच्या किंवा गर्भगृहाच्या बाह्यांगावर आढळतात. तुलापट आणि खांब यांना जोडणारी आधारशिल्पेही या मंदिरांमध्ये आढळतात. <br />
महाराष्ट्र राज्यात बीड जिल्ह्यात [[केदारेश्वर देवालय|धर्मापुरी]] येथील वामन आणि बली, राक्षसाला मारणारा विष्णु ही शिल्पे उत्तर चालुक्य शिल्पशैलीचे व्यवच्छेदक नमुने आहेत.<ref>{{स्रोत पुस्तक | लेखक = डॉ. अ.प्र. जामखेडकर | शीर्षक = महाराष्ट्र राज्य गॅझेट, इतिहास-प्राचीन काळ, खंड १ भाग २ | भाषा = मराठी }}</ref> या कलापरंपरेतील मनुष्याकृतीशिल्पे चांगलीच गुबगुबीत आणि मांसल आहेत. शरीरावयांचा गुबगुबीतपणा इतका भरीव आहे, की शरीराचा सांगाडा सूचित करणारे अस्थिसंगत स्नायू आणि हाडांचा भाग या मांसल भागाखाली पुरेपूर झाकला गेला आहे. गुडघ्याचा भागही किंचित निमुळत्या फुगवट्याद्वारे दाखविण्यात आला आहे. गोलाकार आणि हनुवटी पुढे आलेल्या चेहर्यावरील डोळे, नाक आणि भरगच्च भुवयाखाली आलेले डोळेच काय ते दिसतात. स्त्रियांच्या बाबतीत त्यांचे स्तन व नितंबभाग फुगीर झालेला आढळतो. या मूर्ती [[होयसळ]] मूर्तीशिल्पांशी साधर्म्य दाखवित असल्या तरी त्या होयसळ मूर्तीशिल्पाइतक्या मोहक नाहीत. मंदिराच्या बाह्यांगावरील अप्सरा आणि नायिका होयसळ काळातील लावण्यवतींशी साधर्म्य दाखवितात. या मूर्तींमध्ये वाद्ये वाजविणारी स्त्री, पक्षी व माकडाबरोबर खेळणाऱ्या स्त्रिया, प्रेमपत्र लिहिणारी स्त्री इत्यादी मूर्तीशिल्पांचा समावेश होतो.