"मॉलिब्डेनम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 98 langlinks, now provided by Wikidata on d:Q1053
No edit summary
ओळ ६:
 
== उपयोग ==
मॉलिब्डेनमचे कितीतरीअनेक उपयोग आहेत. मॉलिब्डेनमयुक्त रंग मृत्तिकाशिल्पात, प्लॅस्टिक उद्योगात, कातडी कमाविण्यासाठी, सुती व लोकरी कापड उद्योगात वगैरे केला जातो तर मॉलिब्डेनम ट्रायॉक्साइडचा उत्प्रेरक म्हणून तेलाच्या भंजनात व इतर रासायनिक प्रक्रियांमध्ये वापर होतो. उच्च वितळणबिंदू आणि अगदी कमी प्रसरणांक यामुळे विद्युत्अभियांत्रिकी, रेडियो इलेक्ट्रॉनिक्स व उच्च तपमान तंत्रक्षेत्रात मॉलिब्डेनमचा उपयोग केला जातो. नेहमीच्या विद्युतदीपातील (बल्ब) [[टंग्स्टन|टंग्स्टनची]] तार मॉलिब्डेनमच्या खोबणीत बसवलेली असते तेच कार्य [[विजाणू|इलेक्ट्रॉन]] व [[क्ष-किरण]] नळ्यातदेखील मॉलिब्डेनमला करावे लागते. बंदुकीच्या नळ्या, विमाने व मोटारींचे विविध भाग, बाष्पयंत्रे, टर्बाइन, धातू कापण्याची यंत्रे या ठिकाणीसुद्धा मॉलिब्डेनमचे सहकार्य मोलाचे ठरते.
 
मॉलिब्डेनमच्या खनिजांचा मोठा भाग '''फेरोमॉलिब्डेनम''' या मिश्र धातू निर्मितीसाठी वापरला जातो. यामुळे उच्च दर्जाचे [[पोलाद]] तयार होते. टंग्स्टनही पोलादाच्या मजबुतीसाठी उपयोगी पडते पण मॉलिब्डेनम अधिक प्रभावी आहे. पोलाद निर्मितीच्यावेळी १ % टंग्स्टन वापरून जेवढी मजबुती आणता येते तेवढीच मजबुती केवळ ०.३ % मॉलिब्डेनम वापरून आणता येते शिवाय टंग्स्टनपेक्षा मॉलिब्डेनम स्वस्त पडत असल्याने मॉलिब्डेनमलाच लोखंडाचा एकनिष्ठ सहकारी म्हटले जाते.
 
[[अॅल्युमिनियम|ऍल्युमिनियम]], [[तांबे]], [[निकेल]], [[कोबाल्ट]], [[टायर्टनियमटायटॅनियम]] यांचा पायाभूत धातू म्हणून उच्च ताकदीच्या टंग्स्टन किंवा मॉलिब्डेनमच्या तंतूंचे बळकटी आणण्यासाठी उपयोग केल्याने वरील धातू / मूलद्रव्ये [[टायटॅनियम|टायटॅनियमपेक्षा]] दुप्पट ताकदीचे होतात. वितळलेल्या [[काच|काचेत]] मॉलिब्डेनम मिसळल्यावर काचेचा रंग सूर्यप्रकाशात निळा होतो आणि रात्री तीच काच पूर्णपणे पारदर्शी होते.
 
{{विस्तार}}