"निकोलस मदुरो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''निकोलस मदुरो मोरोस''' हे व्हेनेझुएलाचे राजकारणी आ...
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
(काही फरक नाही)

२३:५९, १५ एप्रिल २०१३ ची आवृत्ती

निकोलस मदुरो मोरोस हे व्हेनेझुएलाचे राजकारणी आहेत. व्हेनेझुएलाचे लोकप्रिय नेते हुगो चावेझ यांचे राजकिय वारसदार मानले जातात. हुगो चावेझ यांच्या सरकारमध्ये ते उपराष्ट्रपती आणि परराष्ट्र मंत्री होते. चावेझ यांच्या निधनानंतर मार्च २०१३ मध्ये ते काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून नियुक्त झाले. त्यानंतर झालेल्या फेरनिवडणुकांमध्ये १४ एप्रिल २०१३ रोजी निर्वाचन आयोगाने त्यांना विजयी घोषित केले.

बसचालक असलेले मदुरो कामगार संघटनांचे अध्यक्ष झाले आणि पुढे २००० मध्ये केंद्रिय मंत्री म्हणून निवडून आले. चावेझ सरकारमध्ये अनेक पदे भुषविल्यानंतर २००६ मध्ये परराष्ट्र मंत्री झाले. निकोलस हे चावेझ यांच्या आतल्या गोटातील अत्यंत खास आणि धोरणी नेते म्हणून ओळखले जात.