"मार्गारेट थॅचर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २:
 
रसायन शास्त्राची पदवी असताना त्यांनी कायद्याचा अभ्यास करून बॅरिस्टरची पदवी मिळवली.१९५९ मध्ये [[फिंचले|फिंचलेमधून]] खासदार म्हणून निवडून आल्या [[एडवर्ड हीथ]] यांच्या सरकारमध्ये १९७० मध्ये त्यांची शिक्षण आणि विज्ञान राज्यमंत्री म्हणून नेमणूक झाली. १९७५ मध्ये हीथ यांचा पराभव करून त्या पक्षाच्या अध्यक्षपदी निवडून आल्या आणि ब्रिटनच्या पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या झाल्या. १९७९ च्या सार्वत्रिक निवडणूकांच्या विजयानंतर त्या पंतप्रधान झाल्या.
 
[[१० डॉनिंग स्ट्रिट]](पंतप्रधान कार्यालय) मध्ये आल्यावर त्यांनी तातडीने काही महत्वाचे राजकिय आणि अर्थव्यवस्था सुव्यवस्थित करण्यासाठी ठोस कार्यक्रम लागू केले. ब्रिटनच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेला कारणीभूत असणाऱ्या गोष्टिंना त्यांनी सर्वतोपरी आळा घालण्याचा प्रयत्न केला. आर्थिक विकेंद्रिकरण, सरकारी उद्योगांचे खासगिकरण, कामगार संघटनांचे खच्चिकरण या गोष्टिंच्या त्या खंद्या पुरस्कर्त्या होत्या. पंतप्रधान पद ग्रहण केल्यानंतर प्रसिद्धिच्या शिखरावर पोहोचलेल्या थॅचर यांची ढासळत्या अर्थव्यवस्थेमुळे आणि वाढत्या बेरोजगारीमुळे लोकप्रियता कमी होऊ लागली. पण नंतर आलेल्या आर्थिक विकासाच्या लाटेमुळे आणि १९८२ मध्ये आर्जेंटिना बरोबर झालेल्या [[फॉकलंड युद्ध|फॉकलंड युद्धामुळे]] त्या पुन्हा एकदा लोकप्रिय नेत्या झाल्या आणि १९८३ मध्ये पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान झाल्या.
 
१९८७ मध्ये थॅचर तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्या. या काळात त्यांनी करप्रणालीत केलेल्या बदलांमुळे आणि युरोपियन संघराज्याबद्दल त्यांच्या मताबद्दल त्यांना टिकेला सामोरे जावे लागले. त्यांच्या सरकारमधील अनेक जण त्यांच्याविषयी नाराज होते. [[मायकल हेसेलटाईन]] यांनी थॅचर यांच्या नेतृत्वाला आव्हान देण्याला सुरूवात केल्यावर नोव्हेंबर १९९० मध्ये थॅचर यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला.
 
{{विस्तार}}