'''कालाब्रिया''' ({{lang-it|Calabria}}) हा [[इटली]]च्या मध्यदक्षिण भागातील एक [[इटलीचे प्रदेश|प्रदेश]] आहे. [[इटालियन द्वीपकल्प]]ाच्या दक्षिण टोकावर वसलेल्या कालाब्रियाच्या पूर्वेस [[आयोनियन समुद्र]], पश्चिमेला [[तिऱ्हेनियन समुद्र]], नैऋत्येला [[मेसिनाची सामुद्रधुनी|मेसिनाच्या सामुद्रधुनीपलीकडे]] [[सिसिली]] तर उत्तरेला [[बाझिलिकाता]] प्रदेश आहेत. ऐतिहासिक काळात [[नेपल्सचे राजतंत्र|नेपल्स]] व [[दोन सिसिलींचे राजतंत्र|दोन सिसिलींच्या राजतंत्रांचा]] भाग असलेल्या कालाब्रियाचा ४२ टक्के भाग डोंगराळ आहे. [[कातान्झारो]] ही आब्रुत्सोचीकालाब्रियाची राजधानी तर [[रेद्जो कालाब्रिया]] हे येथील सर्वात मोठे शहर आहे.
कृषी व पर्यटन हे येथील प्रमुख उद्योग असून येथील ७० टक्के झाडे [[ऑलिव्ह]]ची आहेत.