"करडा (वाशिम)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ ३४:
असे असताना गावाच्या एकाकडेला एक टेकडी आहे. या टेकडीखाली शेकडो वर्षांपूर्वी दडलेले देवीचे मंदिर आहे, अशी अख्यायिका आहे. त्यामुळे गावातील लोक मोठ्या भक्तीभावाने या टेकडीची पूजा करतात. या टेकडीचे उत्खनन झाल्यास गावाचा खरा इतिहास समोर येईल, या हेतूने माजी सरपंच अशोकराव देशमुख यांनी पुरातत्व विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला; परंतु संबंधितांनी दखल घेतली नाही. सध्या आता या टेकडीवर ग्रामस्थांनी लोकवर्गणी करून देवीचे छोटे मंदिर बांधले आहे. ॠषीटेकडी म्हणून तिची ओळख आहे.
==करडा नाव कसे पडले?==
गावाचे नाव करडा कसे पडले याचा काहीही संदर्भ कुठेलचकुठेच उपलब्ध नाही; पण पूर्वी या परिसरात सिंचनाची फारशी व्यवस्था नव्हती. मोजक्याच शेतक-यांच्या शेतात विहिरी होत्या. त्यामुळे अल्प पाण्यावर येत असलेले करडई हे पीक गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणात घेत असावे. त्यावरून करडा हे नाव पडण्याची शक्यता आहे. आता करडई सोबतच कपाशी हे गावातील प्रमुख पीकही हद्दपार झाले. महाराष्ट्रात करडा हे नाव असलेले हे एकमेव गाव आहे.
== प्राचिन वस्तीचा पुरावा (काताळशिल्प)==
हे गाव जरी प्राचिन नसले तरी या परिसरात कधीकाळी मनुष्य होती याचा पुरावा गावाच्या बाहेर उत्तरेकडे असलेल्या दोन काताळशिल्पावरून मिळतो. हे काळात शिल्प माजी सरपंच बाबाराव देशमुख यांच्या शेतात आहे. ते कधी कोरले गेले? कुणी कोरले? या बाबत कुणालाच काहीही माहिती नाही; पण हे काताळशिल्प म्हणजे थडगी असावी. कारण दोन दगडं जमिनीत पुरलेले आहेत आणि त्यावर परत जाणा-या पावलांचे ठस्से आहेत. त्यामुळे ही थडगीच असावी, याला पुष्ठी मिळते. शिवाजी ती दोन ते अडीच हजार वर्षांपूर्वीची असावी.
ओळ ४०:
हिंदू आणि बौद्ध धर्मिय अधिक. सध्या गावामध्ये मुस्लिम धर्माचे केवळ एकच घर. पूर्वी गावात मुस्लिमांची सहा कुटुंबे होती; पण कालांतराने ती जवळच्याच रिसोडला स्थायिक झाली. त्यांची घरे आणि शेत जमिनी अजूनही गावामध्ये आहेत. त्यासाठी त्यांचे गावात नेहमी येणे-जाणे असते.
== धार्मिक स्थळे ==
गावामध्ये मारुती, गणपती, विठ्ठल-रुख्माई ही तीन मंदिर आहेत. शिवाय ॠषीटेकडीवर नव्याने दुर्गादेवीचे मंदिर बांधण्याचे काम सुरू आहे. गावा बाहेर जुने आणि नवे असे भवानी मातेचे दोन मंदिरं आहेत. पैनगंगेच्या काठावर महादेवाचे मंदिर आहे. शिवाय मुस्लिम धर्माचा पीरसुद्धा गावात आहेतआहे.
== अर्थव्यवस्था ==
बहुतांश ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. काही पशूपालनही करतात. सोयाबीन, हरभरा, गहू, उडीद, मूग ही प्रमुख पिके आहेत. त्यावरच गावाची अर्थव्यवस्था चालते.