"करडा (वाशिम)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
ओळ ६:
|आकाशदेखावा_शीर्षक= गावा बाहेरचे फलक
|प्रांत=[[महाराष्ट्र]]
|विभाग=[[नागपूरअमरावती विभाग]]
|जिल्हा = [[वाशीम जिल्हा|वाशीम]]
|तालुका_नावे = [[रिसोड तालुका|रिसोड]]
ओळ २९:
== लोकसंख्येचा तपशील ==
गावाची लोकसंख्या १७७३ आहे (पुरुष ९७४, स्त्री ८३१).
 
== इतिहास ==
या गावाच्या रचनेवरून हे गाव प्राचिन नसावे याला पुष्ठी मिळते. गावात एकही जुने मंदिर नाही. जुनी वास्तू म्हणावी ती केवळ गढी आहे. ती पूर्णतः ढासळली आहे; मात्र निजाम, मोगल यांच्या कार्यकाळातच गढी बांधल्या गेल्या. परिणामी, हे गाव ३५० ते ४०० वर्षांपूर्वीचे असावे असे वाटते. गावातील घरांची बांधणीसुद्धा आधुनिक आहे. जुन्या पद्धतीचा केवळ एकच वाडा आहे. तो पाटलांचा वाडा म्हणून ख्यातीप्राप्त आहे.
असे असताना गावाच्या एकाकडेला एक टेकडी आहे. या टेकडीखाली शेकडो वर्षांपूर्वी दडलेले देवीचे मंदिर आहे, अशी अख्यायिका आहे. त्यामुळे गावातील लोक मोठ्या भक्तीभावाने या टेकडीची पूजा करतात. या टेकडीचे उत्खनन झाल्यास गावाचा खरा इतिहास समोर येईल, या हेतूने माजी सरपंच अशोकराव देशमुख यांनी पुरातत्व विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला; परंतु संबंधितांनी दखल घेतली नाही. सध्या आता या टेकडीवर ग्रामस्थांनी लोकवर्गणी करून देवीचे छोटे मंदिर बांधले आहे. ॠषीटेकडी म्हणून तिची ओळख आहे.
== प्राचिन वस्तीचा पुरावा (काताळशिल्प)==
हे गाव जरी प्राचिन नसले तरी या परिसरात कधीकाळी मनुष्य होती याचा पुरावा गावाच्या बाहेर उत्तरेकडे असलेल्या दोन काताळशिल्पावरून मिळतो. हे काळात शिल्प माजी सरपंच बाबाराव देशमुख यांच्या शेतात आहे. ते कधी कोरले गेले? कुणी कोरले? या बाबत कुणालाच काहीही माहिती नाही; पण हे काताळशिल्प म्हणजे थडगी असावी. कारण दोन दगडं जमिनीत पुरलेले आहेत आणि त्यावर परत जाणा-या पावलांचे ठस्से आहेत. त्यामुळे ही थडगीच असावी, याला पुष्ठी मिळते. शिवाजी ती दोन ते अडीच हजार वर्षांपूर्वीची असावी.
== धर्म ==
हिंदू आणि बौद्ध धर्म. सध्या गावामध्ये मुस्लिम धर्माचे केवळ एकच घर. पूर्वी गावात मुस्लिमांची सहा कुटुंबे होती; पण कालांतराने ती जवळच्याच रिसोडला स्थायिक झाली. त्यांची घरे आणि शेत जमिनी अजूनही गावामध्ये आहेत. त्यासाठी त्यांचे गावात नेहमी येणे-जाणे असते.
== धार्मिक स्थळे ==
गावामध्ये मारुती, गणपती, विठ्ठल-रुख्माई ही तीन मंदिर आहेत. शिवाय ॠषीटेकडीवर नव्याने दुर्गादेवीचे मंदिर बांधण्याचे काम सुरू आहे. गावा बाहेर जुने आणि नवे असे भवानी मातेचे दोन मंदिरं आहेत. पैनगंगेच्या काठावर महादेवाचे मंदिर आहे. शिवाय मुस्लिम धर्माचा पीरसुद्धा गावात आहेत.
== अर्थव्यवस्था ==
बहुतांश ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. काही पशूपालनही करतात. सोयाबीन, हरभरा, गहू, उडीद, मूग ही प्रमुख पिके आहेत. त्यावरच गावाची अर्थव्यवस्था चालते.
 
== प्रशासन ==
ग्रामपंचायत सदस्य संख्या नऊ. प्रकाशकुमार शेषराव धांडे २०१० पासून सरपंच आहेत. त्यांचा कार्यकाळ २०१५ पर्यंत आहे.
गावाची एकूण व्याप्ती १२१५ हेक्टर आहे.
 
== पिण्याच्या पाण्याच्या सुविधा==
या गावात पाटबंधारे विभागाचा सिंचन तलाव आहे. शिवाय पैनंगगा नदीसुद्धा आहे. गावात चार सार्वजनिक विहिरी आहेत. त्यामुळे गावामध्ये अजिबात पाणीटंचाई नाही. राज्य शासनाची पाणीपुरवठा योजना आहे. त्या अंतर्गत संपूर्ण गावांमध्ये नळजोडणी केली गेलेली आहे; पण बहुतांश कुटुंबाकडे स्वतःचे हापशे, कूपनलिका आहेत. शिवाय ग्रामपंचायतीचे दोन हापशे आहेत. त्यामुळे सद्यःस्थितीत नळ योजना बंद आहे.
 
 
== शैक्षणिक सुविधा==
* जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा करडा. इयत्ता पहिले ते चौथी. स्थापना सन १९३३.
* ज्ञानेश्वर विद्यालय करडा. इयत्ता पाचवी ते दहावी. स्थापना सन १९९१. संस्था अध्यक्ष : वामनराव कि. देशमुख. सचिव : अशोकराव आ. देशमुख.
* अप्पास्वामी कृषी विद्यालय, करडा.
* शेतीतंत्रज्ञान महाविद्यालय, करडा
== स्वरानंत रेडिओ केंद्र ==
माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या पुढाकाराने येथे स्वरानंत एफएम रेडिओ केंद्र सुरू झाले आहे. वाशीम जिल्ह्यासह बुलडाणा, qहगोली आणि परभणी जिल्ह्यातील काही भागात त्याच्या कार्यक्रमाचे प्रक्षेपण केले जाते.
== कृषी विज्ञान केंद्र करडा==
या ठिकाणी शेतक-यांना मार्गदर्शन केले जाते शिवाय शेती संबंधी संशोधन केले जाते. माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या पुढाकाराने सुविदे फाउंडेशन अंतर्गत केंद्र सरकारच्या वतीने ते चालविले जाते.
==बाह्य दुवे==
* [http://www.schoolsworld.in/schools/showschool.php?school_id=27060508701 ]
* [http://www.googlemapmaharashtra.org.in/washim/risod/k/karda/]
*[http://www.kvkwashim.com/]
*[http://www.onefivenine.com/india/villages/Washim/Risod/Karda]
*[http://wikiedit.org/India/Karda/196192/]