"सोल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
छोNo edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ २८:
[[कोरियन द्वीपकल्प]]ाच्या मध्य-पश्चिम भागात [[हान नदी]]काठी वसलेल्या सोलला २००० पेक्षा अधिक वर्षांचा इतिहास आहे. [[चोसून]] तसेच [[कोरियन साम्राज्य]]ाच्या काळात सोल हे [[कोरिया]]चे राजधानीचे शहर होते. [[कोरियन युद्ध]]ामध्ये बेचिराख झालेल्या सोलने १९६० ते २००० ह्या ४० वर्षांच्या काळात लक्षणीय प्रगती केली. आजच्या घडीला ७७३.९ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी उलाढाल असलेले सोल हे [[तोक्यो]], [[न्यू यॉर्क शहर]] व [[लॉस एंजेल्स]]खालोखाल जगातील चौथ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेचे शहर आहे. तंत्रज्ञानामध्ये जगात आघाडीवर असणाऱ्या सोलमध्ये [[सॅमसंग]], [[एलजी]], [[ह्युंडाई]] इत्यादी महा-कंपन्यांची मुख्यालये आहेत.
 
सोलमध्ये जगातील सर्वोत्कृष्ट पायाभुत सुविधा असून येथील वाहतूक व्यवस्था अव्वल दर्जाची आहे. [[सोल महानगरी सबवे]] ही जगातील सर्वाधिक लांबीची शहरी भुयारी रेल्वे आहे व येथील [[इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ]] सर्रास जगात सर्वोत्तम मानला जातो.
 
सोल हे [[१९८६ आशियाई स्पर्धा]], [[१९८८ उन्हाळी ऑलिंपिक]] तसेच [[२००२ फिफा विश्वचषक]] स्पर्धांचे यजमान शहर होते. सोल महानगरामध्ये [[युनेस्को]]ची ४ [[जागतिक वारसा स्थान]]े आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/सोल" पासून हुडकले