Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १८३:
 
पुरुष, तरुण, वरुण, करुण, गरुड, विरुद्ध, सुरुवात, मरुत, क्षयरुग्ण, कुरुक्षेत्र, गारुडी, रुपे, रुपये, रुतणे, तरुवर, तुरुतुरु असल्या शब्दांतला रु (र्‍ु ) ऱ्हस्व असतो..[[सदस्य:J|J]] ([[सदस्य चर्चा:J|चर्चा]]) १२:०५, २७ मार्च २०१३ (IST)
--------------------------
आपण कुठल्यातरी लेखात आलेला सत्पुरुष या शब्दातला रु सुधारून रू केला आहे. तसे करायला नको होते, हे सांगण्यासाठी ऱ्हस्व ’रु’च्या शब्दांची छोटीशी यादी दिली आहे. अनेकांना (आपणांस नव्हे) मराठीत दोन रु आहेत हेच माहिती नसते. काही फॉन्ट बनविणाऱ्यांनी फक्त दीर्घ रू आणि दीर्घ ॡ चीच सोय केली आहे. मराठी ख, ल, आणि श अनेक फॉन्ट्‌समध्ये नसतात. मराठी क्र हे अक्षर वर्णपटावरून गायब झाले आहे. ते अक्षर पूर्वी त्र च्या उजव्या बाजूला क ची वाटी जोडून लिहीत. काही फॉन्ट्समध्ये श्र हे अक्षर मुळाक्षर म्हणून दिलेले असते, त्यामुळे शृंगार हाशब्द बहुधा श्रृंगार असा चुकीचा छापला जातो. फॉन्ट्स तयार करणाऱ्यांना मराठी येत नाही आणि ज्यांना मराठी येते त्यांना फॉन्ट्‌स करता येत नाहीत. अशी परिस्थिती जोवर आहे, तोवर असेच चालणार.
 
हाच प्रकार जाहिरात क्षेत्रात आहे. ज्यांना मराठी येते त्यांना जाहिराती बनवता येत नाही, आणि जे जाहिराती बनवतात त्यांना मराठी येत नाही. त्यामुळे ९९ टक्के जाहिरातीतले मराठी अशुद्ध असते....[[सदस्य:J|J]] ([[सदस्य चर्चा:J|चर्चा]]) १२:४३, २९ मार्च २०१३ (IST)