"चित्ता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: ceb:Acinonyx jubatus
ओळ ३०:
अफ़्रिकेतील मुख्यत्वे सव्हानाच्या गवताळ प्रदेशात अजूनही चित्याचे अस्तित्व आहे जेथे खाद्याची मुबलकता आहे. अशा भागात अजूनही चित्ते मुबलक आढळतात. [[केनिया]],[[झिंबाब्वे]], [[बोटस्वाना]],[[दक्षिण आफ्रिका]], [[नामिबिया]], [[युगांडा]] इत्यादी देशात आढळतो.
 
सुयोग
== वर्णन ==
चित्याच्या अंगावरचे ठिपके भरीव असतात व चेह-यावरील अश्रूंसारख्या दिसणाऱ्या रेषा हे त्याचे वैशिष्ट्य आहे.चित्ताचे ओळखण्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे अंगावरचे ठिपके. ठिपक्यांमुळे [[बिबट्या]] आणि चित्यामध्ये लोक नेहेमी गफलत करतात. परंतु दोन्ही प्राण्यात मूलभूत फ़रक आहे. चित्याच्या अंगावरचे ठिपके हे भरीव असतात तर बिबट्याचे आतून पोकळ असतात. चित्याचे ठिपके हे २ ते ३ सें.मी. व्यासाचे असून ते केवळ बाह्य भागातील त्वचेवर असतात. पोट व पायांचे आतील भागांवर ठिपके नसतात. चित्याच्या चेहऱ्यावर दोन काळ्या रेषा असतात त्या ओघळणाऱ्या अश्रूंप्रमाणे दिसतात. बाकी शरीरयष्टीमध्ये दोन्हींमध्ये मूलभूत फ़रक आहे. बिबट्यांची शरीरयष्टी ही भरभक्कम मांजरांसारखी गुबगुबीत असते, तर चित्याची कुत्र्याप्रमाणे लांब सडक जोरात पळण्यास सक्षम अशी असते. चित्याची छाती ही खोलवर व कंबर अतिशय बारीक असते. पाय अतिशय लांब सडक व लवचिक असतात. चित्याचे वजन साधारणपणे ४० किलोग्रॅमांपर्यंत भरते. त्याची लांबी सव्वा ते १.३५ मी.पर्यंत भरते. चित्याची शेपटी साधारणपणे ८४ सें.मी.पर्यंत असते. लांब शेपटीचा उपयोग चित्याला पळताना दिशा बदलायला होतो. शेपटीच्या टोकाला सुरेख काळा पुंजका असतो. चित्याचे अजून एक वैशिठ्य म्हणजे त्यांच्या नख्या. चित्यांना इतर मांजरांप्रमाणे नखे पुर्णपणे आत घेता येत नाही. ती अर्धवट बाहेर अर्धवट आत घेता येतात. तर मांजरांना पुर्णपणे आत बाहेर करता येतात. याचा फ़ायदा चित्यांना अतिवेग घेण्यास ज़ालेला आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/चित्ता" पासून हुडकले