"मोहरम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: ps:د حسن او حسين مياشت
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Scenes in the procession at the Mohurrum festival.jpg|250px|इवलेसे|उजवे|मोहरमच्या वेळचे हैद्राबादमधील १८९० मधील दष्य]]
मोहरम ([[इंग्लिश]]-Muharram, [[अरबी भाषा|अरेबिक]]: المحرّم)- '''मोहरम''' किंवा '''मुह्हरम''' हा एक [[मुस्लिम]] सण आहे. इस्लाम साठी मोहरम हा वर्षारंभ मानतात. मोहरम याचा अर्थ "निषिद्ध, धिक्कार करण्यासारखा" असा आहे.
==इतिहास==
[[मोहम्मद पैगंबर|पैगंबर]] म्हणजे इस्लामचा 'पैगाम 'म्हणजे संदेश माणसापर्यंत पोचवणारा. [[मोहम्मद पैगंबर|पैगंबराने]] हा धर्म निर्माण केला. त्याला या धर्माचा 'इलहाम' झाला. त्याला जेव्हा याचा 'इलहाम' झाला म्हणजे दृष्टांत झाला त्यावेळेस त्याला आपण काय बोलत आहोत, कुठे आहोत याची जाणीव उरलेली नव्हती. त्या दिवसापासून याला, "सल्लील्लाहू अलेह वसल्लम हजरत पैगंबर नबी" असे म्हणू लागले. सुरवातीस हा युद्ध व रक्तपातास निशिद्ध असा महिना होता. हा महिना तसा पवित्र होता, परंतु इमाम हुसेन याच्या वधाची घटना याच महिन्यात घडली म्हणून हा महिना अशूभ ठरला. [[मोहम्मद पैगंबर|हजरत पैगंबर नबी साहेबांचे]] मुलीकडून नातू असलेले हसन व हुसेन यांना त्यांच्या शत्रूंनी म्हणजे [[सुन्नी इस्लाम|सुन्नी पंथाच्या]] खलीफांनी इ.स. च्या सातव्या शतकात [[करबला]] मैदानात "दर्दनाक मौतीचा" अविष्कार करत ठार मारले.हा ताबूत बनविण्याचा प्रघात चौदाव्या शतकात विदेशी आक्रमक लंगडा [[तैमूरलंग|अमीर तैमूरलंगने]] सुरू केला. या ताबुताचे तोंड [[मक्का|मक्केकडे]] यांच्या श्रद्धास्थानाकडे करतात. हुसेनचे हत्याकांड झाले त्या दिवशी शत्रूने हुसेनच्या नातेवाईकांना पाणीही मिळू होऊ दिले नाही, म्हणून आज थंड पाण्याची सोय ठिकठिकाणी करतात. शेवटच्या दिवशी सर्व ताबूतांची मिरवणूक काढतात. हा ताबूत प्रकार फक्त [[भारत]], पर्शिया व [[इजिप्त]]मध्ये पाळतात. हा प्रकार अरबस्तानात पाळत नाहीत. ते हा प्रकार अधार्मिक मानतात. कट्टर मुसलमान ताबूत हा मुर्तीपुजेचा प्रकार म्हणून निषिद्ध मानतो. शेवटच्या दिवशी एका दांडक्याला 'पंजा' लावून चांगले वस्त्र बांधतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/मोहरम" पासून हुडकले