"गुरुत्वाकर्षण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१३१ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
[[वस्तुमान]] असलेल्या कोणत्याही दोन वस्तूंच्या एकमेकांकडे आकर्षिल्या जाण्याच्या प्रवृत्तीला '''गुरुत्वाकर्षण''' असे म्हणतात. वजन म्हणजे जमिनीच्या दिशेने असणाऱ्या गुरुत्वाकर्षणामुळे मिळणारे [[त्वरण]] आणि [[वस्तुमान]] यांच्या गुणाकाराएवढे बल. या क्षेत्रात अफाट संशोधन होऊनही दूरदूर ठेवलेल्या दोन वस्तूंमध्ये गुरुत्वाकर्षण का असते हे अजूनही पूर्णपणे समजलेले नाही.
 
गुरुत्वाकर्षण हे [[विद्युतचुंबकत्व]] आणि नाभिकीय दृढ अंतर्प्रभाव (strong interaction) व अदृढ अंतर्प्रभाव (weak interaction) ह्या तिघांसोबत प्रकृतीतील चार मूलभूत अंतर्प्रभावांमधील एक आहे. गुरुत्वाकर्षणाला गणितीय सूत्रात बसवण्यात प्रथम [[आयझॅक न्यूटन]] यशस्वी ठरला. त्याने "[[न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम|वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम"]] मांडला. पण गुरुत्वाकर्षणाच्या न्यूटनच्या नियमांची जागा आता [[अल्बर्ट आइनस्टाइन|अल्बर्ट आइनस्टाइनच्या]] [[साधारण सापेक्षता सिद्धान्त|सर्वसाधारण सापेक्षता सिद्धान्ताने]] घेतली आहे. पण न्यूटनचे नियम सोपे आहेत आणि कमी गुरुत्वाकर्षण बलासाठी अजूनही पुरेसे अचूक आहेत. यासाठी ते नियम सर्वत्र बहुतेक जागी वापरेले जातात.
 
ब्रह्मांडोत्पत्तीच्या दृष्टिकोनातून पाहिले, तर गुरुत्वाकर्षणामुळे पसरलेले पदार्थ संगठित होऊन अखंड राहतात. त्यामुळेच ग्रह, तारे व दीर्घिकांसारख्या स्थूलमानीय वस्तू बनतात. पृथ्वी व इतर ग्रहांच्या सूर्याभोवती, चंद्राची पृथ्वीभोवती अश्या कक्षासुद्धा गुरुत्वाकर्षणामुळेच कायम असतात. संवहन (convection) व भरती-ओहोटी अश्या पृथ्वीवर पाहिल्या जाणाऱ्या घटनांपासून ते तारकांच्या आंतरिक भागांमधील उष्णतेसारख्या घटनांपर्यंत भरपूर तथ्यांमध्ये गुरुत्वाकर्षणाचा वाटा आहे.
=== आधुनिक संकल्पना ===
==== न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम ====
[[File:Sir Isaac Newton (1643-1727).jpg|thumb|[[आयझॅक न्यूटन|सर आयझॅक न्यूटन]], इंग्रज भौतिकशास्त्रज्ञ, ज्याने वैश्विक गुरुर्त्वाकर्षणाचा नियम मांडला]]१६८७ मध्ये न्यूटनने 'प्रिन्सिपिया' ह्या ग्रंथात वैश्विक गुरुत्वाकर्षणाच्या नियमाची परिकल्पना मांडली. त्यच्या स्वतःच्या शब्दांत:
[[चित्र:NewtonsLawOfUniversalGravitation.svg|इवलेसे|न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमाचे चित्रीकरण. m<sub>1</sub> हा वस्तुमान m<sub>2</sub> ह्या वस्तुमानाला F<sub>2</sub> बलाने व m<sub>2</sub> हा m<sub>1</sub>ला F<sub>1</sub> बलाने आकर्षितो. न्यूटनच्या [[न्यूटनचे गतीचे नियम|तिसऱ्या नियमाप्रमाणे]] F<sub>1</sub> व F<sub>2</sub> ही बले समान मापांची व विरुद्ध दिशांमध्ये असतात. G हा [[गुरुत्व स्थिरांक|वैश्विक गुरुत्व स्थिरांक]] आहे आणि r हे दोन्ही वस्तुमानांमधील अंतर आहे]]
१६८७ मध्ये न्यूटनने 'प्रिन्सिपिया' ह्या ग्रंथात वैश्विक गुरुत्वाकर्षणाच्या नियमाची परिकल्पना मांडली. त्यच्या स्वतःच्या शब्दांत:
<blockquote> मी असा तर्क केला की जी बले ग्रहांना आपल्या गोलकात ठेवतात, ती बले परिक्रमणाच्या केंद्रापासूनच्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात नक्की [असावी]: आणि या प्रकारे मी चंद्राला पृथ्वीभोवतीच्या गोलकात ठेवायला लागणाऱ्या बलाची तुलना पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या गुरुत्वाकर्षणाशी केली; आणि त्याचे नीटनेटके उत्तर मिळाले.<ref>चंद्रशेखर, सुब्रह्मण्यन (२००३). न्यूटन्स प्रिन्सिपिया फॉर द कॉमन रीडर (Newton's Principia for the common reader). ऑक्सफर्ड: ऑक्सफर्ड विद्यापीठ मुद्रणालय. (pp.1–2).</ref></blockquote>
 
[[न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम]] खालीलप्रमाणे आहे:
{| style="padding:5px;"
 
|-
<blockquote>|colspan=2| प्रत्येक वस्तुमान बिंदू इतर प्रत्येक वस्तुमान बिंदूला दोन्ही बिंदूंना जोडणाऱ्या रेषेत, एका बलाने आकर्षितो. हे बल दोन वस्तुमानांच्या गुणाकाराच्या समप्रमाणात आणि त्यांच्यामधल्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते.:<ref name=Newton1/blockquote>
|-
|valign="top"|
:<math>F = G \frac{m_1 m_2}{r^2}\ </math>,
येथे:
* ''m''<sub>१</sub> - पहिले वस्तुमान,
* ''m''<sub>२</sub> - दुसरे वस्तुमान,
* ''F'' - दोन्ही वस्तुमानांमध्ये असलेले प्रयुक्त बल
* ''G'' - [[गुरुत्व स्थिरांक]], आणि
* ''r'' - दोन वस्तुमानांच्या केंद्रांना जोडणारे अंतर.
|valign="top"|
[[चित्र:NewtonsLawOfUniversalGravitation.svg|200px|Diagram of two masses attracting one another]]
|}
 
थोडक्यात काय तर वस्तुमानांचा गुणाकार जास्त असेल तर गुरुत्वाकर्षण जास्त आणि गुणाकार कमी असेल तर कमी. याउलट जर दोन वस्तुमानांमधील अंतरांच्या मोजमापाचा वर्ग जास्त, तर गुरुत्वाकर्षण कमी, आणि वर्ग कमी असेल तर गुरुत्वाकर्षण अधिक.
६८

संपादने