"किर्गिझस्तान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४५:
 
== इतिहास ==
वर्तमान किर्गिझस्तानाच्या भूभागावर प्राचीन काळी [[सिथियन लोक|सिथियन टोळ्यांची]] वस्ती होती {{संदर्भ हवा}}.
 
[[अरब लोक|अरबांशी]] व्यापार करणाऱ्या [[तुर्क लोक|तुर्क]] व्यापाऱ्यांमार्फत इ.स.च्या ७व्या शतकापासून मध्य आशियात [[इस्लाम धर्म|इस्लाम]] पसरू लागला. इ.स. ८४० साली जॉर्डन राजाच्या आधिपत्याखाली किर्गिझ लोकांनी [[उय्गुर]] खाखानतीवर विजय मिळवला व राज्याच्या सीमा पूर्वेकडे विस्तारल्या. पुढील दोनशे वर्षे [[थ्यॅन षान]] पर्वतरांगांपर्यंतच्या भूप्रदेशावर किर्गिझांची हुकमत अबाधित राहिली. मात्र इ.स.च्या १२व्या शतकात [[मंगोल राज्यविस्तार|मंगोलांच्या आक्रमणापुढे]] किर्गिझांची पीछेहाट होत, [[आल्ताय पर्वतरांग|आल्ताय]] आणि [[सायान पर्वतरांग|सायान]] पर्वतरांगांच्या प्रदेशापुरतीच त्यांची सत्ता उरली. इ.स.च्या १३व्या शतकात [[मंगोल साम्राज्य|मंगोल साम्राज्या]]च्या उदयामुळे किर्गिझांनी दक्षिणेस स्थलांतरे केली. [[चंगीझ खान|चंगीझ खानाने]] इ.स. १२०७ साली किर्गिझांवर विजय मिळवला.
 
किर्गिझ टोळ्यांवर आणि त्यांच्या मुलखावर इ.स.च्या १७या शतकात मंगोल [[ओइरात लोक|ओइरातांचे]], इ.स.च्या १८व्या शतकाच्या मध्यास [[मांचू लोक|मांचू]] [[छिंग राजवंश|छिंग साम्राज्याचे]] आधिपत्य होते. इ.स.च्या १९व्या शतकाच्या पूर्वार्धात या प्रदेशावर [[कोकंदाची खानत|कोकंदाच्या उझबेक खानतीची]] सत्ता राहिली. इ.स.च्या एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात [[रशियन साम्राज्य]] आणि चिनी छिंग साम्राज्यादरम्यान झालेल्या दोन तहांद्वारे वर्तमान किर्गिझस्तानाचा बह्वंशी भूभाग रशियास तोडून देण्यात आला. ''किर्गिझिया'' या तत्कालीन रशियन नावाने ओळखला जाणारा हा भूभाग रशियन साम्राज्यात इ.स. १८७६ साली अधिकृतरित्या सामील करण्यात आला. पुढे झारशाही उलथून सोव्हियेत राजवट आल्यावर [[रशियाचे सोव्हियेत साम्यवादी संघीय प्रजासत्ताक|सोव्हियेत रशियाचे]] [[कारा-किर्गिझ स्वायत्त ओब्लास्त]] या नावाने या भूभागास [[ओब्लास्त|ओब्लास्ताचा]] दर्जा मिळाला. दशकभराने ५ डिसेंबर, इ.स. १९३६ रोजी [[किर्गिझ सोव्हियेत समाजवादी प्रजासत्ताक]] या रूपाने यास प्रजासत्ताकाचा दर्जा मिळाला.
 
इ.स. १९९०-९१ दरम्यान किर्गिझ सोव्हियेत समाजवादी प्रजासत्ताकात [[किर्गिझस्तान लोकशाहीवादी चळवळ]] जोर धरू लागली. इ.स. १९९१ साली मार्च ते ऑगस्ट महिन्यांदरम्यान झालेल्या राजकीय घडामोडींची परिणती म्हणजे ३१ ऑगस्ट, इ.स. १९९१ रोजी '''किर्गिझस्तानाचे प्रजासत्ताक''' सोव्हियेत संघातून फुटून स्वतंत्र झाले.
 
== बाह्य दुवे ==