"प्रजननसंस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:शरीरशास्त्र
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ १:
{{विकिकरण}}
'''प्रजजनप्रजनन'''
सजीवाच्या एका पिढीतून दुसऱ्या पिढीमधील जननिक तत्वांचे “जनुकीय द्रव्याचे” होणारे संक्रमणम्हणजे प्रजनन. प्रत्येक सजीवाचा आयु:काल मर्यादित असतो. सजीव आयु:कालामध्ये जन्म, वृद्धि, विकास आणि मृत्यू अशा अवस्थेतून जातो. वृद्धिअवस्था एका ठरावीक मर्यादेपर्यंत पोहोचल्यानंतर सजीव प्रजननक्षम होतो.
 
ओळ १५:
शिस्न हे समगमाचे पुरुष इंद्रिय आहे. शिस्नाचे तीन भाग असतात. त्याचा प्रारंभीचा भाग पोटास चिकटलेला असतो. मध्यभाग दंडगोलाकृति असतो आणि टोकाशी शिस्नमणि. शिस्नमण्यावर एक सैल त्वचावरण असते. काहीं जमातीमध्ये त्वचा शस्त्रक्रियेने काढून टाकण्यात येते. शिस्नाच्या टोकावर मूत्रनलिका उघडते. या नलिकेतून मूत्र आणि वीर्य वहन होते. शिस्नावर संवेदी चेतातंतूंची टोके असतात. शिस्नाचा दंडगोलाकृति भागामध्ये तीन वर्तुळाकृति पोकळ्या असतात. यामध्ये स्पंजासारख्या पोकळ उती असतात. या उतीमध्ये रक्त साठून राहिले म्हणजे शिस्न ताठ होते. समागमाच्या वेळी या शिस्नावाटे वीर्य स्त्री जननेंद्रियामध्ये क्षेपित करता येते. शिस्नावरील त्वचा सैल असल्याने शिस्नाचा आकार मोठा झाला तरी ते शिस्नास सामावून घेते. शिस्न ताठ झाल्यानंतर मूत्रनलिकेतील मूत्रप्रवाह तात्पुरता खंडित होतो. समागमाच्या वेळी वीर्यस्खलनास अडथळा न येण्यासाठीची ही योजना आहे.
 
[[वृषणकोश]] : शिस्नाच्या खालील बाजूस पोटाजवळ असलेली सैल त्वचेची पिशवी म्हणजे वृषणकोश. वृषणकोशामध्ये वृषणे असतात. याना होणारा रक्तपुरवठा आणि चेता वृषणकोशा मध्ये प्रवेशतात. वृषणकोश वृषणाचे तापमान नियंत्रित करते. वृषणामध्ये शुक्रजंतू निर्मितीचे कार्य शरीराच्या तापमानापेक्षा थोड्या कमी तापमानास सुरळीतपणे होते. वृषणकोशाच्या स्नायूमुळे वृषणकोश सैल किंवा आकुंचन पावण्यास मदत करतात. थंडीमध्ये वृषणकोश शरीराजवळ तर उन्हाळ्यात ते शरीरापासून थोडेसे दूर ठेवले जातात. यामुळे वृषणाचे तापमान आवश्यकतेनुसार नियंत्रित होते. अति घट्ट अंतर्वस्त्रे वापरल्याने वृषणकोशाचे तापमान शरीराएवढे होते आणि शुक्रजंतू निर्मितीमध्ये अडथळा येतो. शुक्रजंतूंची संख्या कमी होण्याचे हे एक कारण आहे.
 
[[वृषण]] : मानवी वृषणकोशामध्ये दोन वृषणे असतात. सैल बंधनाने वृषणे वृषणकोशामध्ये स्थिर केलेली असतात. वृषणकोशाभोवती असलेल्या श्वेत प्रावरण आणि परिवृषण अशा दोन थरामुळे वृषणाचे संरक्षण होते. वृषणामध्ये रेतोत्पादक नलिकांचे मोठ्याप्रमाणात जाळे आणि अंतराली उतक व सर्टोली पेशी असतात. वृषणाच्या सूक्ष्म रचनेमध्ये रेतोत्पादक नलिकांचे मोठ्या प्रमाणात असलेले जाळे, अंतराली उतक आणि त्यातील अंतस्त्रावी पेशी असे असते. रेतोत्पादक नलिकेमध्ये शुक्रजनन पेशी आणि सर्टोलि पेशी असतात. शुक्रजनन पेशींचे विभाजन होऊन शुक्राणू तयार होतात. पेशीच्या आकाराचे शुक्राणूंचे पोषण सर्टोलि पेशीमधून होते. या वेळी त्यांचा आकार बदलून शुक्रजंतूसारखा होतो. रेतोत्पादक नलिकामध्ये दररोज तीन कोटि शुक्राणू तयार होतात. गुंतागुंतीच्या नलिका जालामधून सर्टोलि पेशींमधून स्त्रवलेला द्रव आणि शुक्राणू शुक्राणूवाहक नलिकेमध्ये वीर्याच्या स्वरूपात साठून राहतात.
 
पुरुष प्रजनन संस्थेमध्ये असलेल्या बाह्य इंद्रियाबरोबर बाहेरून न दिसणारी काहीं इंद्रिये म्हणजे अधिवृषण,रेतोवाहिनी, स्खलन वाहिनी, मूत्रनलिका, रेताशय, पुरस्थ ग्रंथी, आणि काउपर ग्रंथी. अधिवृषण वृषणाच्या वरील बाजूस असते यामध्ये असलेल्या जालिकेमध्ये शुक्राणूंचे मॅच्युरेशन होते. पण हे शुक्राणू हालचाल करू शकत नाहीत. अधिवृषणामधील शुक्राणू पुढे सरकून रेतोवाहिनीमध्ये साठून राहतात. रेतोवाहिनीच्या पुढील टोकास एक फुगीर भाग असतोत्यास स्खलन वाहिनी असे म्हणतात. समागमाच्या वेळी स्खलनवाहिनीचे आकुंचन झाले म्हणजे शुक्राणू मूत्रनलिकेमधून शिस्नावाटे स्त्री जननेंद्रियामध्ये क्षेपिले जातात. याच वेळी शुक्राणूबरोबर रेताशय आणि पुरस्थ ग्रंथीमधील स्त्राव शुक्राणूबरोबर मिसळून वीर्य तयार होते. रेताशयामध्ये फ्रुक्टोज शर्करा तयार होते.फ्रुक्टोज शर्करा हे शुक्राणूंना ऊर्जा देते. पुरस्थ ग्रंथीमध्ये फायब्रिनोजेन हे गोठण द्रव्य आणि सी जीवनसत्व तयार होते. हे सर्व घटक वीर्याच्या निर्मितीसाठी आवश्यक आहेत.